Headlines

Video of youth teaching the constitution to mumbai police goes viral after delhi police crackdown; मुंबईत पोलीस रस्त्यावरून हकलून द्यायला आले, तरुण पोराने अख्खं संविधान शिकवलं; कर्मचारी गुपचूप निघून गेला


मुंबई: जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जनंतर देशभरातील वातावरण ढवळून निघालं असून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध राज्यांमध्ये तरुण रस्त्यावर उतरत आंदोलन करत असून महाराष्ट्रही याला अपवाद नाही. राजधानी मुंबईत पोलिसांनी जमावबंदी लादल्यानंतरही विद्यार्थी आपला आवाज बुलंद करत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची धरपकड सुरू असून पोलीस आणि विद्यार्थ्यांच्या बाचाबाचीचेही व्हिडिओ समोर येत आहे. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून मी कोणतंही आंदोलन करत नसताना तुम्ही मला रस्त्यावरून का हटवत आहात, असा सवाल करत एका तरुणाने पोलिसांची बोलती बंद केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

मुंबईतील आंबेडकर गार्डन येथील हा व्हिडिओ असून तिथं थांबलेल्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी हटकलं. त्यानंतर विधी शाखेचं शिक्षण घेत असलेल्या मुंबईतील या तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला नियम सांगत कोणत्या कायद्यान्वये तुम्ही मला इथून हटवत आहात, असं विचारलं. तुम्हाला इथं थांबता येणार नाही, असं पोलीस कर्मचाऱ्याने म्हणताच तरुण म्हणाला की, “जमावबंदी आहे मान्य आहे, पण भाषण स्वातंत्र्य आहे की नाही? तुम्हाला भारतीय संविधानातील आर्टिकल १९ माहीत आहे का? कुठेही फिरण्याचं, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे की नाही? आम्ही आंबेडकर गार्डनच्या इथं उभा आहोत आणि तुम्ही आम्हाला सांगताय की जमावबंदी आहे. पण ही पब्लिक प्लेस आहे ना? मी रोज इथं पाया पडायला येतो. “

दरम्यान, “भारताची सगळ्यात मोठी शक्ती ही युवा आहेत, असं अब्दुल कलाम यांनी सांगितलं आहे. शिक्षणामुळे आज तुम्ही वर्दीत आहात आणि शिक्षणावर जर आवाज उठवला जात असेल तर काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही पोलीस आहात, लाठीचार्ज हा कंबरेच्या खाली अलाऊड असतो. दिल्ली पोलिसांनी पोरांची डोकी फोडली, मुलींना कपडे फाडेपर्यंत मारलं, तुमच्याकडे काय उत्तर आहे? तुमच्याकडे उत्तर नसेल तर आम्हालाही उत्तर मागायला तुम्ही इथे येऊ नका,” असं विद्यार्थ्याने खडसावताच पोलीस कर्मचारी तिथून निघून गेला.

विद्यार्थी आंदोलनासाठी ‘ऑनलाइन’ आवाहन, ‘ऑफलाइन’ मदतीचा हात

मुंबईत होत असलेल्या विद्यार्थी आंदोलनात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचाही सहभाग दिसून आला. त्यांनी आंदोलनाची माहिती विविध समाजमाध्यमांवर पोहोचवण्याबरोबरच प्रत्यक्ष आंदोलनस्थळी पिण्याचे पाणी, बिस्किटे आणि अन्य आवश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यामुळे आंदोलन केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता, सहभागींसाठी परस्पर सहकार्याचे चित्रही पाहायला मिळाले.

ठाकरे कुटुंबाची विद्यार्थ्यांना साथ

मुंबईतील आंदोलनाला ठाकरे कुटुंबानेही भेट देत पाठिंबा दर्शविला. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले. विद्यार्थी आणि तरुणांनी लोकशाही मार्गाने मांडलेल्या भूमिकेचे कौतुक करत त्यांनी संवाद साधला.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत