Headlines

शहर तुंबते याला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाचा महापालिकेला थेट सवाल


Nagpur News : नाले आणि जलवाहिन्यांच्या साफसफाईचे दावे करणाऱ्या महापालिकेच्या कामकाजावर मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पावसापूर्वीची कामे पूर्ण करण्याच आश्वासन दिली जातात. कामे केली जातात तरी देखील पावसात शहरे तुंबतात याला जबाबदार कोण असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

शहर तुंबले
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी , नागपूर : शहरातील पाणी साचण्याच्या समस्येवर आतापर्यंत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, त्यांचे परिणाम काय झाले आणि भविष्यात कायमस्वरूपी तोडगा कसा काढणार, याचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले. केवळ औपचारिक किंवा मोघम उत्तर स्वीकारले जाणार नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उत्तरात हलगर्जीपणा आढळल्यास थेट महापालिका आयुक्तांकडून उत्तर मागवू, अशी तंबीही न्यायालयाने दिली.

शहर तुंबते याला जबाबदार कोण

पावसाळ्यापूर्वी नाले आणि जलवाहिन्यांच्या साफसफाईचे दावे करणाऱ्या महापालिकेच्या कामकाजावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पावसापूर्वीची कामे केली जातात, तीच आश्वासने दिली जातात; तरीही जुलै-ऑगस्टमध्ये शहरातील अनेक भाग जलमय होतात. शहर तुंबते, याला जबाबदार कोण, असा थेट सवाल न्यायालयाने मौखिक स्वरूपात उपस्थित केला.

न्यायालयाने स्वतःहून दखल घेत मागितले स्पष्टीकरण

शहरातील सिमेंट रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत जनमंच संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरभर पाणी साचल्याच्या प्रकाराची न्यायालयाने स्वतःहून दखल घेत महापालिकेच्या वकिलांकडून स्पष्टीकरण मागितले.

न्यायालयाने कठोर शब्दात यंत्रणेला फटकारले

‘तुम्ही दरवर्षी सांगता की, यंदा अभ्यास केला आहे, नियोजन केले आहे. मात्र, प्रत्येक पावसाळ्यात तीच परिस्थिती दिसते. मग हा अभ्यास नेमका कशासाठी’, अशा शब्दांत न्यायालयाने संबंधित यंत्रणांना फटकारले. केवळ महापालिकाच नव्हे, तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची चिंता न्यायालयाने व्यक्त केली.

Maharashtra TimesGoregaon-Mulund Link Road: तलाव, टेकड्या, उद्यानाखालून जुळे बोगदे, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी ‘टीबीएम’ तयार; महत्त्वपूर्ण टप्पा सुरू होणार

प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या शुक्रवारी

या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या शुक्रवार, ३१ जुलै रोजी होणार आहे. महापालिकेतर्फे अॅड. जेमिनी कासट, तर शासनातर्फे अॅड. संगीता जाचक यांनी बाजू मांडली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या

तिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याची नोंद न्यायालयाने घेतली. सोमलवार निकालस शाळेसमोरील रस्त्याच्या कामामुळे पडून असलेल्या मलब्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. लहान मुलांच्या सुरक्षिततेकडेही प्रशासनाने दुर्लक्षकेल्याचे नमूद करत, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

Maharashtra TimesHeat Wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, अकोला जगात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद, किती दिवस धोका?

नरेंद्रनगरात विदारक स्थिती

दरवर्षी अतिवृष्टी झाली की नरेंद्रनगर आणि मनीषनगर या पट्ट्याचा शहराशी संपर्क तुटतो. यंदाही अनेकांना चिंचभुवन-खापरी मार्गाने यू-टर्न घेऊन यावे लागल्याची बाब सुनावणीदरम्यान समोर आली. नरेंद्रनगर-मनीषनगर परिसरातील परिस्थिती अधिकच विदारक असते, अशी मौखिक टिप्पणी न्यायालयाने केली.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा