Headlines

vasai-virar municipality first general meeting held on 16 feb standing committee members elected ; वसई-विरार महापालिकेची पहिली महासभा; स्थायी समितीवर 16 सदस्यांची निवड


म. टा. वृत्तसेवा, वसई: वसई-विरार महापालिकेची पहिली महासभा शुक्रवारी दुपारी पार पडली. यावेळी स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली असून सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्याचीदेखील निवड करण्यात आली आहे. मात्र, या महासभेच्या आधीच भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करत सर्व नगरसेवकांसाठी स्वतंत्र दालनाची मागणी केली. त्यामुळे महासभेपूर्वी तणावाचे वातावरण तयार झाले होते.

वसई-विरार महापालिकेची निवडणूक संपून महिना उलटला आहे. यादरम्यान महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडी झाल्या असून स्थायी समिती सदस्य, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता या पदांच्या निवडीसाठी पहिल्या महासभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. मात्र, या महासभेआधी भाजप नगरसेवकांनी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करत गोंधळ घातला होता. भाजप गटनेते आणि नगरसेवकांना महापालिकेत बैठकीसाठी जागा (दालन) उपलब्ध नसल्याचे सांगत ती उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर महासभा सुरू होणार असल्याने नगरसेवक सभागृहात दाखल झाले.

Maharashtra TimesMarathi Schools: मुंबईत मराठी शाळांची दैना! तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर, काय कारण?
पक्षीय संख्याबळानुसार बविआला स्थायी समितीत १० सदस्य पाठवण्याची संधी मिळाली, तर भाजपचे ६ सदस्य निवडले गेले. बविआ गटनेते प्रवीण शेट्टी यांनी १० सदस्यांची यादी सादर केली, तर भाजप गटनेते अशोक शेळके यांनी ६ सदस्यांची यादी सादर केली. बविआचे संख्याबळ जास्त असल्याने सभागृह नेते म्हणून प्रफुल्ल साने यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेते म्हणून भाजपचे मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सभागृह नेते प्रफुल्ल साने यांनी एकत्रितपणे काम करणार असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनीही सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

Maharashtra TimesMantralaya Bribe Case: गाडे यांचे नाव का लपवले? FDA लाचखोरी प्रकरणात तक्रारदारांचा आक्षेप
निवडून आलेले १६ सदस्य
प्रवीण शेट्टी, नरेंद्र पाटील, लॉरेल डायस, पंकज पाटील, रंजना थालेकर, आलमगीर डायर, प्रफुल्ल पाटील, चंद्रशेखर धुरी, सुनील आचोळकर, स्वनिल कवळी, प्रज्ञा पाटील, महेश सरवणकर, दर्शना त्रिपाठी, निलेश चौधरी, जितेंद्र पाटील, अभय कक्कड.

स्थायी समिती सभापतिपदी प्रवीण शेट्टी ?
स्थायी समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर सभापती निवडीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जाहीर होणार आहे. यासाठी महापालिकेतर्फे विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. बहुमतानुसार स्थायी समिती सभापतिपद बहुजन विकास आघाडीकडे राहणार हे स्पष्ट असले, तरी या पदासाठी माजी महापौर प्रवीण शेट्टी यांचे नाव चर्चेत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत