Headlines

Vandana Gupte Punished Non Marathi Auto Rickshaw Driver For Using Bad Language ; अमराठी रिक्षावाल्याकडून शिवीगाळ, वंदना गुप्तेंनी तिथल्या तिथे दाखवलेला इंगा! पॅसेंजरला बाहेर काढून थेट रिक्षाच टाकली पाडून


Vandana Gupte Exclusive Interview : अभिनेत्री वंदना गुप्तेंना चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या सहन होत नाही मग त्या तिथल्या तिथे त्यावर व्यक्त होतात. एकदा एका उर्मठ अमराठी रिक्षा चालकाला त्यांनी धडा शिकवला होता.

वंदना गुप्ते
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वंदना गुप्ते या मराठी इंडस्ट्री मधील दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मालिका, सिनेमा आणि नाट्य विश्व या सर्वांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या आठवणींचा खजिना आणि किस्स्यांचा साठा आहे. अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नुकतीच महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या लग्नाचे किस्से, नाटकादरम्यान खटकणाऱ्या गोष्टी, राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला यांच्याशी असली मैत्री, बाळासाहेब ठाकरेंसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध, प्रवासादरम्यानचे किस्से यांसारख्या गोष्टी सांगितल्या.

अभिनेत्री वंदना गुप्ते या बिनधास्त अभिनेत्री आहेत. त्यांना एखादी गोष्ट खटकली तर ती मनात न ठेवता त्या बोलून व्यक्त होतात. प्रशांत दामले यांनी सुद्धा जेव्हा महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनला मुलाखत दिली होती तेव्हा त्यांनी वंदना गुप्ते यांचा उल्लेख करत त्यांच्यासमोर मला नेहमीच सतर्क राहावं लागतं असं सांगितलं होतं. वंदना गुप्ते या कामात जितक्या चोख आहेत तितक्याच त्या शिस्तप्रिय देखील आहे.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनला दिलेल्या मुलाखती त्यांनी सांगितले की रिक्षावाले फार भेधरकारक लोक आहेत. मला वाटतं की आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जी भाषेवरून मोहिम चालू आहे ती बरोबर आहे कारण त्यांना ताळ्यावर आणलंच पाहिजे. मी टॅक्सीवाल्यांसारखी गाडी चालवते. तशी चालवली नाही तर तुम्ही एकदम धिम्या गतीने चालवत बसाल. मुंबईत अशी गाडी चालवून फायदा नाही हे मी आधीच शिकले आहे.

Maharashtra TimesRishi Saxena On Isha Keskar : UP चा म्हणून लोक बोलतात, वडिलही फार आनंदी नव्हतेच,ईशा केसकरसोबतच्या १० वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपबद्दल बरंच काही बोलला ऋषी सक्सेना
एकदा मी प्रयोग करून येत होते. त्याच रात्री मला अमेरिकेला दौऱ्याला जायचं होतं. शिवाजी मंदिरचा प्रयोग करून रात्री दीड वाजता आम्हाला एअरपोर्टसाठी जायचं होतं. मी गाडी घेऊन निघाली, माझ्यासोबत सुधीर बर्वे होते. रस्त्यात एका रिक्षावाल्याला मी ओव्हरटेक करून पुढे गेले. त्याला या गोष्टीचा इतका राग आला की त्याने मला अर्वाच्च भाषेत शिव्या द्यायला सुरुवात केली. ते मी ऐकलंच… त्यावेळी एसी गाड्या नसल्यामुळे खिडक्या उघड्या असायच्या. मी ते ऐकलं आणि सांताक्रुझ पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या डिव्हायडरच्या इथे मी मुद्दामून त्याच्या आडवी गाडी घातली. त्याला दुसरीकडे गाडी घालता येत नव्हते ते बघून मी गाडीतून खाली उतरले.

Maharashtra TimesSubhash Ghai On Balasaheb Thackeray : ‘चोली के पिछे क्या है’ गाण्यामुळे लोकांचा संताप पण बाळासाहेब ठाकरेंची मदत, सुभाष घईंनी सांगितली आठवण
मी त्याला विचारलं तू मला काय म्हणालास? तर तो मला उर्मठा सारखंच म्हणाला मैंने क्या बोला! मग मी त्याच्या मागे बसलेल्या पॅसेंजरला विचारलं हा काय बोललं ते तुम्ही ऐकलात का? तर ते म्हणाले हो आम्ही ऐकलं खूप चुकीचं बोलला तो. मग मी त्याला ती शिवी बोलून दाखवली आणि म्हटलं हे तू असं का म्हणालास? तर तो मला बोलला की तुम कैसे गई मेरे गाडी के सामने से! मग मी त्याला त्याच्या रिक्षातून खाली उतरवलं आणि त्या पॅसेंजरला पण म्हणाले की तुम्हाला तुमचा जीव प्यारा असेल तर तुम्ही पण खाली उतरा.

खरं तर आमच्या बिल्डिंगच्या खाली रिक्षामध्ये ऑईलींग करतात ते दुकान आहे. त्यामुळे मी ते पाहत असल्याने रिक्षा तिरपी कशी करतात हे मला ठाऊक आहे. मग मी तशीच रिक्षा तिरपी खालून खाली अलगद पाडली. रिक्षावाला बघत बसला आणि मला मागून बोलत होता की ये आप क्या कर रहे हो! त्याच्यासमोरच मी माझे हात झटकले आणि पुढे गेले कारण मला पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जायला वेळ नव्हता कारण माझी फ्लाईट होती. तेव्हा संध्याकाळचे साडेसात आठ वाजले होते. शिवाजी मंदिर होऊन प्रयोग संपून मी माझ्या घरी जात होते. त्यामुळे तिथल्या तिथे मी त्याला उत्तर दिलं होतं.

अभिनेत्री वंदना गुप्तेंच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्या सध्या संकर्षण कऱ्हाडे सोबत कुटुंब किर्तन या नाटकात दिसत आहेत.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा