Headlines

Usha Nadkarni Life Story: वडिलांनी केला कोयत्यानं हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, मुलगा आजही आई मानत नाही; ८० व्या वर्षी एकाकीपण,अभिनेत्री उषा नाडकर्णींच्या आयुष्यात घडलंय बरंच काही


मुंबई: सिनेविश्वातील अभिनेत्रींचं आयुष्य हे अनेकदा पडद्यावर दिसतं त्याहून बरंच वेगळं असतं. अनेक ज्येष्ठ अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितलं आहे. आता अभिनेत्री उषा नाडकर्णी चर्चेत आल्या आहेत. मुलगा, सून असतानाही त्या वयाच्या ८० व्या वर्षी देखील त्या एकट्या राहत असल्याचं सांगतात.

छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा… नेहमी कडक आणि खाष्ट सासू साकारणाऱ्या या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड एकाकीपण दडलं आहे. गेल्या ३९ वर्षांपासून मुंबईतील घरात एकट्या राहणाऱ्या उषा नाडकर्णी यांनी आपल्या पतीपासून ताटातूट आणि मुलासोबतच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.

मुलाचे ते शब्द ऐकून झाल्या भावुक

एका मुलाखतीत बोलताना उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या मुलाबद्दल (अभिजीत) सांगताना अत्यंत भावूक भावना व्यक्त केल्या. माझा मुलगा मला आजही मला आई मानत नाही, तो म्हणतो की ‘तू मला फक्त जन्म दिलाय, माझी खरी आई तर माझी आजीच होती!’.

उषा यांनी त्यांची बाजू सांगत म्हटलं की, त्या काळात नाटकांचे एकाच दिवसात अनेक प्रयोग असायचे आणि मालिकेच्याशूटिंगमुळं त्या सतत कामात व्यग्र असायच्या. यामुळं मुलाचा संपूर्ण सांभाळ त्यांच्या आई-वडिलांनी आणि भावानं केला. कामाच्या व्यापाने मुलाला पुरेसा वेळ न देऊ शकल्यामुळं मुलाच्या मनात ही भावना राहिली आहे.

३९ वर्षांपासून जगतातय एकाकी आयुष्य

१९८७ सालापासून म्हणजेच गेल्या ३९ वर्षांपासून उषा नाडकर्णी मुंबईत एकट्याच राहत आहेत. लग्नानंतर काही वर्षांतच त्या पतीपासून वेगळ्या झाल्या. मात्र, त्यांनी सासरचे ‘नाडकर्णी’ हेच आडनाव कायम ठेवलंय. पतीविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्यात मतभेद झाले आणि आम्ही वेगळे झालो, पण माझ्या मनात त्यांच्या कुटुंबाबद्दल कोणताही द्वेष नाहीए.तसंच त्या मुलगा, सून आणि नात त्यांच्यासोबत राहत नाहीत, सकाळी उठणं, स्वयंपाक करणे, पूजा-अर्चा करणं आणि नातीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणे, असा त्यांचा दिनक्रम असतो.असंही त्यांनी सांगितलं.

Maharashtra TimesPreity Zinta: मी बावरले, खूपच टेन्शन आलं, ‘बटवारा १९४७’ मधील सर्वात कठीण सीन शूट करताना प्रीती झिंटाची झालेली अशी अवस्था, काय घडलेलं नेमकं?
“जर मला झोपेतचं काही झालं तर…”

८० व्या वर्षी एकटेपणाची सवय झाल्याचं सांगताना त्या मृत्यूबद्दलही व्यक्त झाल्या.मला आता एकटं राहण्याची सवय झाली आहे, भीती वाटत नाही. आपण कधी आणि कसे मरणार हे कोणालाच ठाऊक नसतं. जर मला झोपेतच काही झालं तर, तर कदाचित दुसऱ्या दिवशी शेजारी येऊन दरवाजा ठोठावतील आणि विचार करतील की म्हातारीनं अजून दरवाजा का उघडला नाही!”

Maharashtra TimesPreity Zinta: मी बावरले, खूपच टेन्शन आलं, ‘बटवारा १९४७’ मधील सर्वात कठीण सीन शूट करताना प्रीती झिंटाची झालेली अशी अवस्था, काय घडलेलं नेमकं?

मी बिग बॉसमध्ये पुन्हा अजिबात जाणार नाही; उषा नाडकर्णी यांनी सांगितलं कारण

लहानपणीच्या वेदनादायी आठवणी

उषाजींनी आपल्या लहानपणीच्या कठीण काळाबद्दलही सांगितलं. त्यांचे वडील अत्यंत रागीट स्वभावाचे होते. एकदा भावाला वाचवताना वडिलांनी त्यांच्यावर थेट कोयत्यानं वार केला होता, अशी कटू आठवण त्या सांगतात. या घटनेत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. तरीही हाताला पट्टी बांधून त्यांनी नाटकाचा प्रयोग पूर्ण केला होता. तसंच, अभिनयाच्या आवडीमुळं आईने एकदा त्यांचे सामान घराबाहेर काढलं होतं, असंही त्या म्हणाल्या.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत