Headlines

US Treasury Yield 19 Year High; अमेरिकेत शेअर मार्केट बुडणार असल्याचा तज्ज्ञांचा इशारा, खरंच असं घडलं तर भारतावर कितपत परिणाम होईल?


US Bond Yields: भारतीय रिझर्व्ह बँक सणासुदीच्या हंगामात लवकरच व्याजदर म्हणजे रेपो दर कमी करेल आणि तुमच्या गृहकर्ज किंवा वाहन कर्जाचे हप्ते कमी करेल, अशी अपेक्षा करत असाल तर तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे. यंदा कर्जाचे व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षा मावळताना दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचे कारण भारतात नसून सातासमुद्रापार अमेरिकेच्या बॉण्ड मार्केटमधील भयंकर ‘वादळ’ आहे.

अमेरिकी बॉण्ड यील्डचा विक्रमी उच्चांक

अमेरिकी बॉण्ड बाजार पुन्हा वर-खाली होत आहे. अमेरिकी बॉण्ड यील्डमुळे जागतिक बाजारांची धाकधूक वाढली आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने पुढील काही महिन्यांत 10, 20 आणि 30 वर्षीय सरकारी रोख्यांचे बायबॅक किमान दुपटीने वाढवण्याची घोषणा केली असून या घोषणेनंतर बुधवारी रोख्यांवरील परतावा घसरला, पण हा दिलासा अल्पकाळ टिकला.

Maharashtra Times8व्या वेतन आयोगात बसणार मोठा धक्का, पगारात भरघोस वाढ; पण DA, HRA, CEA, LTC चे एरिअर्स विसरायचं, का?अमेरिकी बॉण्ड मार्केटमध्ये त्सुनामी आली आहे ज्याचे परिणाम भारतापर्यंत भोगावे लागू शकतात. दीर्घकालीन बॉण्डवरील परतावा स्थिर करण्यासाठी अमेरिकेच्या ट्रेझरीने बायबॅक वाढवले ​​आहेत.

यासह अमेरिकी बॉण्ड यील्ड 19 वर्षांच्या उच्चांकावर उसळले असून जेव्हा जेव्हा जागतिक शेअर बाजारात मोठा भूकंप आला, तेव्हा तेव्हा त्याचे धागेदोरे अनेकदा अमेरिकन बॉण्ड बाजाराशी जोडलेले होते, तर आता सध्या जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणजेच अमेरिकेच्या बॉण्ड बाजारात असेच वादळ उठले आहे. मात्र, अमेरिकेच्या ट्रेझरीने बाजारात बॉण्ड बायबॅक करून यील्ड्स नियंत्रित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यामुळे यील्ड्स काही काळासाठी घसरले पण, वाढत्या महागाईबद्दल चिंता आणि पुरवठ्याच्या दबावामुळे पुन्हा वधारले.

Maharashtra TimesSuccess Story : बाळासाठी नोकरी सोडली तेव्हा वाटलं करिअर संपलं, आता घरबसल्या 21 लाख रुपयांची कमाईअशा परिस्थितीत यूएस बॉण्ड यील्डमधील वाद केवळ वॉल स्ट्रीटपुरते मर्यादित नाही, ज्याचा थेट परिणाम दलाल स्ट्रीट आणि भारतातील तुमच्या गुंतवणुकीवर होईल. यूएस बॉण्ड बाजारातील नेमका काय खेळ होतोय आणि तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज का आहे सोप्या भाषेत समजून घेऊ.

अमेरिकी बॉण्ड यील्ड भारतासाठी चिंता का?

अमेरिकी सरकारचे कर्ज पहिल्यांदाच 40 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहेत. सरकारी कामकाजासाठी निधी उभारण्यासाठी सतत नवीन रोखे जारी करावे लागतात आणि रोख्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढतो व खरेदीदारांची संख्या कमी होते तेव्हा परतावा आपोआप वाढतो. अशा परिस्थितीत, जेव्हा अमेरिका कोणत्याही जोखमीशिवाय – सुरक्षित सरकारी रोखे – सुमारे 5% उत्कृष्ट परतावा देऊ लागते, तेव्हा परदेशी गुंतवणूकदार भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांमधून पैसे काढू लागतात.

Maharashtra TimesGold Silver Price Hike: सोन्या-चांदीचा पुन्हा खणखणाट, गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर समाधान; सराफा बाजारातील दरांना फुटले पंख, थेट गगनाला भिडले दरशेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदार पळ काढणे

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे FIIs भारतीय बाजारासाठी चिंतेची बाब बनली असताना बॉण्ड यील्ड परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून निधी काढून अमेरिकी बॉण्ड्समध्ये गुंतवत आहेत. त्यामुळे, अमेरिकेत कोणत्याही जोखमीशिवाय हमीयुक्त परतावा मिळताना भारतीय बाजाराची जोखीम का घेतील? यामुळे देशांतर्गत शेअर बाजारावर विक्रीचा मोठा दबाव निर्माण होतो.

कमजोर रुपया, महागाईची चिंता

FIIs भारतातील गुंतवणूक काढून अमेरिकेत नेल्यामुळे रुपया डॉलरमध्ये कन्व्हर्ट करतात. यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि भारतीय रुपया कमजो होतो, परिणामी भारतासाठी कच्चे तेल आणि इतर आयात वस्तू महागतात व आयातित महागाई वाढते.

कर्ज अन् ईएमआय महागाईचा धोका

जागतिक बाजारातील वाढत्या बॉण्ड यील्डमुळे भारतातील बॉण्ड यील्डवरील दबावही वाढतो. अशा स्थितीत, भारतात बॉण्ड यील्ड्स वाढल्यास बँकांना निधी उभारणे अधिक महाग होईल, ज्याचा थेट परिणाम गृहकर्ज किंवा वाहन कर्जाच्या ईएमआयवर होऊ शकतो.

अशा परिस्थितीत, आयातित महागाई वाढल्यास रिझर्व्ह बँकेला व्याजदर म्हणजे रेपो रेट कपात करणे परवडत नाही. त्यामुळे, Repo Rate न झाल्यास गृहकर्ज किंवा वाहन कर्जाचे ईएमआय स्वस्त करणे बँकांना परवडत नाही.