Gujarat Suthar Family dies in US Fire : मॉटेलच्या इमारतीत धूर आणि आगीच्या ज्वाळा पसरु लागताच हितेशने मदतीसाठी मोटेलच्या फ्रंट डेस्कवर फोन केला, मात्र त्यांना मिळालेला सल्ला जीवघेणा ठरला

दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक
मूळचे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नडियाद येथील असलेले हे कुटुंब सुमारे दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले होते. हितेश नोकरी करत असलेल्या ‘इकोनो लॉज’ या मोटेलमध्येच तिघांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास मोटेलमध्ये आग लागली.
बाथरुममध्ये लपण्याचा सल्ला
इमारतीत धूर आणि आगीच्या ज्वाळा पसरु लागताच हितेशने मदतीसाठी मोटेलच्या फ्रंट डेस्कवर फोन केला. आग लागली तेव्हा ड्युटीवर असलेला हॉटेल कर्मचारी एप्रिल ग्रेझर यांनी सांगितले की, या कुटुंबाने फ्रंट डेस्कशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना बाथरुममधील पाणी चालू करुन तिथेच थांबण्याचा सल्ला देण्यात आला. आपत्कालीन सेवांना बोलावले जाईपर्यंत वाट पाहण्यास सांगण्यात आले.
Pune Crime : लोहगडावरुन केतनला कसं ढकलायचं, लुल्लानगरच्या टेकडीवर केलेली प्रॅक्टिस; पकडलं गेल्यास काय? सिया-चेतनचं प्लॅनिंग समोर
“त्यांनी मला मदत मिळवून देण्याची विनवणी केली, कारण ते इमारतीच्या आत अडकले होते. त्यांना आपल्या खोलीतून बाहेर पडता येत नव्हते. मला त्यांचे रडणे आणि ओरडणे ऐकू येत होते” असे ग्रेझर म्हणाले.
“काही तासांनंतर आग, धूर आणि लोकांचा आरडाओरडा ऐकून मला जाग आली” असे मॉटेलच्या आगीत अडकलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. “मी खिडकीतून बाहेर पाहिले, तेव्हा आग माझ्या गाडीच्या अगदी जवळ पोहोचल्याचे दिसले; त्यामुळे मी गाडी तिथून हलवली आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांतच उरलेली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.” असेही तो पुढे म्हणाला.
Chandrakant Khaire | सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश, चंद्रकांत खैरेंनी गद्दार म्हणत चांगलंच सुनावलं
अग्निशमन दलाचे जवान बचावाला
अग्निशमन दलाचे जवान मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास वूस्टर टाउनशिपमधील ‘इकोनो लॉज’ येथे पोहोचले, तेव्हा आगीच्या ज्वाळा इमारतीच्या छतातून बाहेर पडत होत्या. काही जण अजूनही आत अडकले असून त्यांना बाहेर पडता येत नसल्याची माहिती त्यांना आपत्कालीन कॉलद्वारे मिळाली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचल्यावर अत्यंत गंभीर परिस्थिती असल्याचे सांगितले. इमारतीत आगीचा मोठा भडका उडाला होता आणि आग वेगाने पसरत होती. वूस्टर टाउनशिपचे अग्निशमन प्रमुख डॅलस टेरेल यांनी सांगितले की, आत अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या पथकांनी त्वरित सुरु केला.
छतातून आगीच्या प्रचंड ज्वाळा
“घटनास्थळाकडे जात असतानाच आम्हाला नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, काही लोक ९११ वर फोन करुन आपण इमारतीत अडकल्याचे सांगत आहेत. आमचे पहिले अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले तेव्हा छतातून आगीच्या प्रचंड ज्वाळा बाहेर पडत होत्या; त्या खोलीतील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, परंतु ते प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.” असे टेरेल यांनी सांगितले.
Kerala Nurse : ट्राफिकमध्ये अडकलेल्या कार चालकाला हार्ट अटॅक, दोन नर्सची एसटीतून उडी, गाडीतच CPR देऊन प्राण वाचवले
आगीची तीव्रता वेगाने वाढली आणि तिच्या प्रचंड स्वरुपामुळे तिला अत्यंत गंभीर दर्जाची आग म्हणून वर्गीकृत करण्यात आले. आग नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे १५ अग्निशमन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवळपास ७० जवानांना पाचारण करण्यात आले.
सुतार कुटुंबापर्यंत पोहोचेपर्यंत बराच वेळ गेला होता. त्यामुळे तिघांचाही धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

