यासोबतच ट्रम्प यांनी अमेरिकेकडून होर्मुझ सामुद्रधुनीजवळील इराणी बंदरांची नाकेबंदी पुन्हा सुरू करण्याचीही घोषणा केली. यानंतर तेलाच्या किमती वाढल्या आणि जागतिक शेअर बाजारात घसरगुंडी पाहायला मिळाली.
ITR फॉर्म भरताना घ्या दक्षता! एक चूक अन् हजारोंचा फटका; मग काय आहे योग्य प्रक्रिया? जाणून घ्या
कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ
आदल्या दिवसाच्या घडामोडींनंतर मंगळवार, 14 जुलै रोजी, कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास दोन टक्क्यांनी वाढ झाली आणि क्रूडचे दर चार आठवड्याच्या उच्चांकावर उसळले. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती $1.68 म्हणजेच जवळपास 2% वाढून प्रति बॅरल $84.98 वर पोहोचल्या तर, अमेरिकी WTI क्रूडच्या किमती $1.65 किंवा 2.1% वाढीसह प्रति बॅरल $79.79 वर पोहोचल्या आहेत. त्याचवेळी, मागील सत्रात ब्रेंट क्रूडच्या किमतीत तब्बल 9.6% मोठी वाढ झाली होती, जी मे 2020 नंतर एका दिवसातील सर्वात मोठी वाढ होती.
होर्मुझ स्ट्रेट बनला तणावाचा मुख्य केंद्र
होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढता लष्करी तणाव तेलाच्या किमतींमधील अलीकडच्या वाढीमागील सर्वात मोठे कारण आहे. अमेरिकेने पुन्हा एकदा इराणी जहाजांवर सागरी नाकेबंदी लादली असून या दरम्यान तेहरानकडूनही सातत्याने प्रतिसाद दिला जात आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही देशांमधील वाढत्या संघर्षामुळे बाजारात या मार्गावरील तेल पुरवठ्यात व्यत्यय आल्यास जागतिक ऊर्जा संकट निर्माण होण्याची चिंता निर्माण झाली आहे.
मुंबई-दिल्लीच्या रहिवाशांना दिलासा मिळणार; बेसिक सॅलरी, HRA घसघशीत वाढणार; पाहा 2.0, 2.1, 2.28 आणि 2.57 फिटमेंट फॅक्टरचे संपूर्ण कॅलक्युलेशन
युएईच्या टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतीय कर्मचारी ठार
पश्चिम आशियातील नव्याने वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आणखी एक मोठी घटक घडली. संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ओमानच्या सागरी हद्दीतील होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण मार्गाने प्रवास करणाऱ्या UAE च्या दोन तेल टँकरवर इराणने 2 क्रूझ क्षेपणास्त्रे डागली, ज्यामध्ये एक भारतीय कर्मचारी ठार झाला आणि 8 जण जखमी झाले. या घटनेमुळे सागरी सुरक्षेबद्दलची चिंता आणखी वाढली.
ट्रम्पनी होर्मुझवर टॅरिफ लादला
दुसरीकडे, आदल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने इराणी जहाजांवर पुन्हा नौदल नाकेबंदी लागू केली आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिका ज्या देशांचे संरक्षण करत आहे, त्यांनी त्याबदल्यात अमेरिकेला मोबदला दिला पाहिजे.
ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही देशांमधील संघर्ष वाढण्याची बाजारात ही भीती आणखी वाढली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून पाठवल्या जाणाऱ्या सर्व मालावर अमेरिका 20% शुल्क आकारेल.
जूनच्या मध्यात अमेरिका आणि इराण यांच्यातील तात्पुरत्या शस्त्रसंधी करारामध्ये तेहरानने व्यापारी जहाजांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, अशी अट घातली गेली होती. मात्र, या सागरीमार्गावरील सततच्या हल्ल्यांनंतर ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात ‘शस्त्रसंधी’ आता संपुष्टात आल्याची घोषणा केली.

