US Iran Conflict: गेल्याच महिन्यात इराण सोबत झालेला शांतता करार संपुष्टात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. इराणी नेत्यांवर टीका करत ट्रम्प यांनी आपल्याला कोणताही करार करायचा नसल्याचं जाहीर केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन/तेहरान: इराण सोबत करण्यात आलेला शांतता करार संपुष्टात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मला इराण सोबत कोणताही करार करायचा नाही. आता शांतता चर्चेचा काळ संपलेला आहे, असं ट्रम्प यांनी जाहीर केलं. यानंतर जागतिक पातळीवर हलकल्लोळ उडाला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्याच महिन्यात चर्चा झाली होती. त्यावेळी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी युद्ध कायम स्वरुपी संपवण्याचा मानस व्यक्त केला होता. पण गेल्या एक ते दोन दिवसांत होर्मुझच्या सामुद्रधुनीत ३ जहाजांवर हल्ले झाले. त्यामुळे तणाव वाढला. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराण सोबत कोणताही करार न करण्याची भूमिका घेतली आहे. Indian Family Dies: अमेरिकेत हॉटेलला आग, भारतीय कुटुंबाचा हृदयद्रावक अंत; फ्रंट डेस्कनं दिलेला सल्ला जीवघेणा ठरला माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला लक्ष्य केलं. ‘ते आजारी मानसिकतेचे लोक आहेत. मला त्यांच्याशी कोणताही करार करायचा नाही. इराणसोबतच्या सामंजस्याचा काळ आता संपलेला आहे, असं मला वाटतं,’ असं ट्रम्प म्हणाले. याचवेळी ट्रम्प यांनी नाटो, ग्रीनलँड आणि स्पेनवरही तिखट शब्दांत भाष्य केलं. इराण सोबत कोणताही नवा करार करायची माझी इच्छा नाही. हा मुद्दा आता संपलाय, असं मला वाटतं, असं ट्रम्प म्हणाले.
इराणी जनतेचा उल्लेख आजारी मानसिकतेचे असा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी करार करण्यासंदर्भात अनिच्छा व्यक्त केली. याचवेळी त्यांनी नाटोबद्दलही नाराजी बोलून दाखवली. अमेरिकेसोबत अन्याय होत आहे. नाटोमध्ये अमेरिका आपल्या भागिदारीपेक्षा अधिक योगदान देत आहे. ग्रीनलँडचा मुद्दा अमेरिकेसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, असं म्हणत ग्रीनलँडच्या मुद्द्यावर नाटोनं घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तुरुंगात दोन गटांमध्ये जबर हाणामारी; संघर्षात 3 अधिकाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक जखमी इराण सोबतची शस्त्रसंधी संपली आहे का? १४ मुद्द्यांचा सामंजस्य करार निष्प्रभ ठरला आहे का? असे प्रश्न एका पत्रकारानं ट्रम्प यांना विचारले. त्यावर माझ्या हिशोबानं हा करार संपला आहे. मला इराणी लोकांशी कोणताही व्यवहार करायचा नाही. ते वाईट आहेत. ते आजारी मानसिकतेचे आहेत. इराणी जनतेचं प्रतिनिधीत्व आजारी मानसिकतेच्या लोकांकडे आहे. ते अतिशय क्रूर आणि हिंसक आहेत, असं ट्रम्प म्हणाले.
इराणवर अमेरिकेकडून करण्यात आलेल्या ताज्या हल्ल्यांवरही डोनाल्ड ट्रम्प सविस्तर बोलले. ‘काल रात्री इराणच्या अतिशय धोकादायक लोकांवर आम्ही जबरदस्त हल्ले केले. आम्ही त्यांना म्हटलं, जा अंत्यविधीची कामं करा. पण त्याऐवजी त्यांनी जहाजांवरुन रॉकेट डागण्यास सुरुवात केली. त्यामुळे आम्ही काल रात्री त्यांच्यावर जोरदार हल्ले केले,’ असं ट्रम्प यांनी सांगितलं.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा