Telugu software engineer Avinash Narne arrested for Wife Raajitha Sabbineni Murder in United States Crime News; कफ सिरप घातलेली स्मूदी, प्रेयसीला चार फोन; पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर अविनाश नरणे गोत्यात
Telugu software engineer Avinash Narne arrested for Wife Raajitha Sabbineni Murder in United States Crime News; कफ सिरप घातलेली स्मूदी, प्रेयसीला चार फोन; पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर अविनाश नरणे गोत्यात
Crime News : भारतातील एका महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या अविनाश नरणे याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून करुन तिचा अकस्मात मृत्यू झाल्याचा बनाव रचला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन : अमेरिकेत कार्यरत असलेला ३० वर्षीय भारतीय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर अविनाश नरणे याच्यावर पत्नीच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. वॉशिंग्टनमधील बेल्व्ह्यू येथील राहत्या घरात अविनाशच्या पत्नीचं शव आढळल्यानंतर नऊ महिन्यांनी हा आरोप ठेवण्यात आला. ‘किंग काउंटी प्रॉसिक्युटिंग ॲटर्नी’ कार्यालयाने १ जुलै रोजी अविनाश नरणेवर ‘फर्स्ट-डिग्री मर्डर’चा आरोप निश्चित केला. फर्स्ट-डिग्री मर्डर म्हणजेच पूर्वनियोजित हत्या. अविनाश सध्या ५० लाख डॉलर्सच्या जामिनाच्या अटीवर कोठडीत असून, ७ जुलै रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
अनेक महिन्यांच्या तपासानंतर, सरकारी वकिलांनी आरोप केला की ही एक पूर्वनियोजित हत्या होती; भारतातील एका महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या अविनाशने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला, त्यानंतर एक बनाव रचला. तेलुगु भाषिक अविनाशचे जेमतेम चार महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.
२७ ऑक्टोबर २०२५ च्या रात्री नक्की काय घडले?
२७ ऑक्टोबरच्या रात्री अविनाशने पोलिसांना फोन करून कळवले की त्याची पत्नी बाथरुममध्ये अडकली आहे आणि बाहेर येत नाहीये. ‘नॉर्थईस्ट १० व्या स्ट्रीट’च्या १३७०० ब्लॉक मधील त्या अपार्टमेंटमध्ये पोलीस अधिकारी पोहोचले तेव्हा त्यांना बाथरुमचा दरवाजा तोडून आत जावे लागले. तिथे अविनाशची २७ वर्षीय पत्नी राजिता सबिनेनी जमिनीवर पडलेली आढळली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. किंग काउंटीच्या वैद्यकीय तपासनीस कार्यालयाने राजिताच्या मृत्यूची नोंद ‘हत्या’ अशी केली. गळा आवळल्यामुळे श्वास कोंडून तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासनीसांनी निश्चित केले.
अविनाशने पोलिसांना काय सांगितले
५ जून २०२५ रोजी माझे लग्न झाले होते. जुलैपासून आम्ही एकत्र राहू लागलो, असे अविनाशने पोलिसांना सांगितले. काही कामासाठी मी अपार्टमेंटमधून बाहेर पडलो होतो. ४० मिनिटांनी परतल्यावर मला रजिता बाथरुममध्ये बंद अवस्थेत आढळली, असा दावा त्याने केला.
भारतात अविनाशची गर्लफ्रेण्ड
पोलिसांनी ‘स्मार्ट लॉक’चा डेटा तपासला असता अविनाश खरोखरच घराबाहेर गेला असल्याचे आढळले. मात्र तो बाहेर असताना घरात इतर कोणीही नव्हते. पोलिसांच्या मते, अविनाशचे भारतातील अन्य महिलेसोबत गुप्त संबंध होते. हे संबंध राजिताशी लग्न होण्यापूर्वीच सुरु झाले होते. ती दुसरी महिला त्यांच्या लग्नालाही उपस्थित राहिली होती आणि अविनाशच्या लग्नानंतरही त्यांच्यातील संपर्क कायम होता.
मृत्यूच्या दिवशी प्रेयसीला चार फोन
राजिताच्या मृत्यूच्या दिवशी अविनाशने त्या महिलेला किमान चार वेळा फोन केला होता. ज्यावेळी आपण बाथरुममध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा अविनाशने केला होता, त्या वेळेचाही या कॉल रेकॉर्डमध्ये समावेश होता. भारतातील त्या महिलेला पाठवलेले आणि नंतर डिलीट केलेले मेसेज याबद्दल जेव्हा पोलिसांनी त्याला विचारणा केली, तेव्हा अविनाशने सांगितले की त्याने राजिताच्या बॉडीचा फोटो पाठवला होता.
कडू स्मूदी
न्यायालयीन दस्तावेजात अशा काही मेसेजचाही उल्लेख आहे, ज्यामध्ये पतीने बनवलेल्या स्मूदीची चव कडू लागत असल्याचं राजिताने मृत्यूच्या आधी म्हटलं होतं. मृत्यूच्या दिवशी तिने अविनाशला सांगितले होते की, त्याने बनवलेल्या स्मूदीची चव “औषधासारखी” आणि “खोकल्याच्या सिरपसारखी” लागत होती. अविनाशने आपण ॲमेझॉनमध्ये काम करत असल्याचे सांगितले होते. गेल्या आठ महिन्यांपासून तो मुक्त होता.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा