Headlines

UPI vs Cash Payment; UPI पेमेंटच्या सवयीमुळे खरंच महिन्याचा बजेट बिघडतो का? दिल्लीतील महिलेने प्रयोग करून शेअर केला अनुभव


UPI Payment: सध्या कॅशलेस युग सुरू आहे आणि लोक क्वचितच वॉलेट वा पर्समध्ये चलनी नोटा बाळगतात. पण UPI करून काही क्लिक्समध्ये पेमेंट करतात, त्यांना खरोखरच फायदा होतो का? दिल्लीतील सदाफचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बहुधा ‘नाही’ असंच म्हणाल. आजच्या काळात UPI सर्वांसाठी पैसा खर्च करण्याचा सोपा मार्ग बनला आहे आणि म्हणून 99 टक्के लोक पाकिटात कॅश बाळगत नाही.

UPI चोरीला जाण्याची भीती नाही आणि एटीएममधून पैसे काढण्याची चिंताही नाही. पण UPI चे फायदे फक्त इतकेच आहेत का? दिल्लीतील सदफने एक अनोखा प्रयोग केला, ज्याची तुम्हाला माहिती असायलाच हवी.

Maharashtra TimesIncome Tax: एक कोटी पॅकेज, तीन घरांच्या मालकाला जेव्हा 15000 रुपयांसाठी कर्ज काढावे लागले; CA ने सांगितले कारण
दिल्लीतील कंटेंट क्रिएटर सदाफने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने 2 महिन्यांहून अधिक काळ आपल्या दैनंदिन खर्चासाठी प्रामुख्याने रोख रकमेचा वापर केल्याबद्दल सांगितले आणि या बदलाचा खर्च करण्याच्या सवयींवर कसा परिणाम झाला, हे स्पष्ट केले.

UPI ऐवजी रोखीने पेमेंट करण्याचे फायदे

सदाफने व्हिडिओमध्ये सांगितले की, आपल्या बहुतेक खरेदीसाठी सलग तीन महिन्यांपासून UPI ऐवजी रोख रकमेचा वापर करत आहे. यामुळे तिला जाणवलेला सर्वात मोठा फरक म्हणजे आपले पैसे नेमके कुठे खर्च होत आहेत, याबद्दल अधिक जाणीव होऊ लागली होती. UPI मुळे पैशांचा मागोवा घेणे अवघड होते. सदाफ म्हणाली की, UPI मुळे काही सेकंदांतच अनेक व्यवहार होऊ शकतात आणि एकूण किती खर्च झाला, याची लोकांना जाणीवही होत नाही त्यामुळे अनेकदा लहान-सहान खर्च नगण्य वाटतात.

Maharashtra TimesTenant Rights: भाडेकरू आहात? घरमालक Rent Receipt देत नसेल तर घाबरू नका! जाणून घ्या तुमचे हक्क, वादावर लागेल ब्रेक
सदाफने कॉफी व अल्पोपाहार खरेदी करणे आणि ऑनलाइन खरेदी करणे यांची उदाहरणे दिली. सदाफने सांगितले की, अनेक लहान-लहान खर्च मिळून एकूण खर्च लवकरच 1000 रुपयांच्या आसपास पोहोचू शकतो, म्हणून खर्च करताना मोठा खर्च होत असल्याची जाणीव होत नाही.

Maharashtra TimesKOSPI Crash: 4 कोटींचा नफा, साडे चार कोटी नुकसान! कुणी फ्लॅट गमावला तर कुणी आयुष्यभराची कमाई, कोरियन मार्केटमध्ये 40 टक्क्यांची घसरण
तिने याची तुलना कॅश वापरण्याशी केली. सदाफ म्हणते की, 500 रुपयांची नोट प्रत्यक्ष हाताने देताना खर्चाबाबत अधिक जाणीव व्हायची, कारण आपल्या पाकिटातून किती पैसे खर्च होत आहेत आणि किती शिल्लक राहिले आहेत, हे तिला लगेचच समजू लागले.

अनावश्यक खर्च बंद झाले

सदाफ म्हणते की “जेव्हा तुम्ही कॅशने व्यवहार करता, तेव्हा तुमच्या वॉलेटमधील शिल्लक रकमेचा हिशोब राहतो. तुम्ही किती खर्च केला आणि किती शिल्लक आहे, हे तुम्हाला माहीत असतं. यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार खर्च करण्यास आणि अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या वॉलेटमधील रकमेनुसारच खर्च कराल, बरोबर ना?”

मात्र, UPI व्यवहार पूर्णपणे बंद करणंही व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही हेही सदाफने मान्य केले. उदाहरणार्थ, तुम्ही 500 रुपयांनी 417 रुपये दिले, तर उरलेले पैसे तुम्हाला कसे मिळतील? त्यामुळे सदफ 80% कॅश आणि 20% यूपीआय वापरत आहे. म्हणजे 400 रुपये रोख दिले आणि 17 यूपीआय केले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत