ग्राहकांमध्ये झालेल्या गोंधळाला अखेर पूर्णविराम मिळाला. PCI ने UPI पेमेंटवर आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्काबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच हे अतिरिक्त शुल्क नक्की कुणाला द्यावे लागेल? ग्राहकांना की व्यापारांना? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर PCI ने दिले आहे. तसेच ग्राहक आणि व्यापारांमध्ये झालेला गैरसमज दूर केला आहे.

अखेर, PCI ने या संपूर्ण मुद्द्यावर स्पष्टीकरण देत ग्राहकांमध्ये झालेला गैरसमज दूर केला आहे. पण PCI ने जरी स्पष्टता दिली असली तरी UPI व्यवहारादरम्यान अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहेच. पण तो कुणाकडून? याचे उत्तर माहित करून घ्या.
- UPI वापरण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल का?
नाही. या आधीही UPI वापरण्यासाठी ग्राहकाला अतिरिक्त पैसे द्यावे लागत नव्हते आणि यापुढेही UPI वापरण्यासाठी ग्राहकांकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारण्यात येणार नाहीये. त्यामुळे ग्राहकांनी निश्चिन्त राहावे.
उदाहरणार्थ, “500 रुपयांची वस्तू खरेदी केल्यावर ग्राहकाला UPI द्वारे पेमेंट करताना 500 रुपयांचीच भरपाई करावी लागणार आहे.”
- UPI वापरण्यासाठी लहानशा दुकानदारांना किंवा किराणा दुकानदारांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल का?
नाही. अगदी लहान दुकानदारांना तसेच किराणा मालाच्या दुकानदारांना UPI पेमेंट करताना किंवा स्वीकारताना कोणत्याही प्रकारची अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार नाहीये.
- MDR म्हणजे काय? MCS म्हणजे काय? कोण करेल या रक्कमेचे भुगतान?
MDR म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट. एखाद्या व्यापाराने UPI पेमेंट स्वीकारल्यानंतर पेमेंट कंपनीला एका विशिष्ट ठराविक टक्केवारीवर द्यायचे कर. MCS म्हणजे मर्चंट सर्व्हिस चार्ज. व्यापाराने पेमेंट सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीला द्यायचे सेवा शुल्क. MCS हे चार्ज म्हणजे व्यापारी आणि पेमेंट सर्व्हिस पुरवणाऱ्यात झालेला एक करार.
उदाहरणार्थ, “जर एखाद्या व्यापाराने 50,000 रुपयांची टीव्ही विकली. ग्राहकाने पैशांचे भुगतान करण्यासाठी UPI पेमेंट सेवा स्वीकारली तर ठरलेल्या दरानुसार व्यापाराने पेमेंट कंपनीला कर द्यावा लागेल.”
- हे कर फक्त मोठ्या व्यापारांसाठीच का?
गेल्या दहा वर्षांपासून जगभरात UPI पेमेंट सेवा मोठ्या संख्येने स्वीकारली जात आहे. या सेवेचा वापर दिवसेंगणित वाढत चालला आहे. त्यामुळे सायबर फ्रॉड, फसवणूक तसेच सायबर गुन्हे टाळण्यासाठी या पेमेंट प्रणालीत सुधार करणे, नवकल्पना लागू करणे गरजेचे आहे. त्यासाठी हाती तितकाच मोठा महसूल असणेही गरजेचे आहे. त्यामुळे मोठ्या व्यापारांकडून सेवा स्वीकारल्यास कर घेतला जाणार आहे.
E20 Petrol Quality: इथेनॉल मिश्रित पेट्रोल एकदम सुरक्षित, वाहनांना धोका नाही! E20 इंधनात भेसळीच्या अफवांवर तेल कंपन्यांचे स्पष्टीकरणPCI च्या स्पष्टीकरणानुसार, ग्राहकांना तसेच लहान व्यापाऱ्यांना UPI द्वारे पेमेंट करताना तसेच पेमेंट स्वीकारताना कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. सामान्य ग्राहक तसेच लहान व्यापाऱ्यांना कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही.

