Headlines

Uddhav Thackeray: प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा का? उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला प्रश्न – uddhav thackeray seeks education minister dharmendra pradhan resign over neet


Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : नीट पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले असून विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. अशावेळी सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केला. एखाद्या व्यक्तीकडून एखादे काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलण्यात सरकारला कमीपणा वाटतो का, असा प्रश्न करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन तिथे एखाद्या सक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

देशभरातील विरोधी पक्षांनी, सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करत ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘सोनम वांगचूक यांच्या बुद्धिमत्तेचा देशासाठी फायदा करून घ्यायला पाहिजे. असे असताना आपल्या देशात अशा व्यक्तीला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले जाते. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.

Maharashtra TimesMumbai AC Local: गर्दीच्या वेळी ‘एसी लोकल’मधील एसी पडला बंद , १५ मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध
चार दिवसांपूर्वी मी फोनवरून त्यांना विनंती केली होती की तुमच्यासारख्या व्यक्ती देशाला हव्या आहेत. सरकारला काही पडलेले नाही. तुमच्यासारख्या व्यक्ती एक एक करून जात असतील तर सरकारला ते हवेच आहे, असे सांगत २०१८ साली जे. डी. अगरवाल यांनी गंगेसाठी उपोषण केले होते. त्यासाठी त्यांनी प्राण सोडले. परंतु त्यांची कुणी दखल घेतली नाही. आज वांगचुक यांचीही सरकार तीच अवस्था करत आहे’, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

१८ तारखेला नागपुरात आंदोलन
‘हिंदुत्वाचा दुरुपयोग करून जो लुटीचा कार्यक्रम सुरू आहे, त्याविरोधात आम्ही दादरला महाआरती आंदोलन केले. आता येत्या १८ तारखेला नागपुरात हा कार्यक्रम होईल आणि मी स्वतः तिथे जाणार आहे. हिंदूंनी आता झोपून चालणार नाही, कोणी आपल्याला लुटत असेल तर जागे झाले पाहिजे’, असेही ठाकरे म्हणाले.

Maharashtra TimesAshwini Bhide: अश्विनी भिडेंचा आदेश, पण ७ दिवसांनंतरही कारवाई नाही; मॅनहोल दुर्घटनेतील कंत्राटदाराची बेपर्वाई, नेमकं काय घडलं?
माणुसकी शिल्लक असेल तर पाठिंबा द्या!
संसदेचे अधिवेशन २० तारखेला सुरू होत आहे. आमचे खासदार हा प्रश्न संसदेत उचलतीलच. परंतु मी सर्व पक्षांच्या, अगदी भाजपच्या खासदारांनाही आणि राज्यसभेतील सदस्यांना उद्देशून सांगतो की, तुमच्यात थोडीशी तरी माणुसकी शिल्लक असेल, तर कृपया विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा द्या. हा देशाच्या तरुणांचा प्रश्न आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनीही त्या व्यासपीठावर जावे. मी स्वतः वेळ पडल्यास तिथे जाईन. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता सुरू आहे. परंतु आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे दाखवून देण्याची वेळ आली आहे, असेही ठाकरे म्हणाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा