Maharashtra Politics : एकनाथ शिंदे आज एनडीए सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : बीएलओ हा बूथप्रमुख आहे आणि त्या बुधप्रमुखाला पक्षाने ताकद दिली पाहिजे, ही योजना देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केली आहे, त्याच्या कुटुंबाचे देखील संरक्षण केलं पाहिजे, यासाठी 2000 बूथप्रमुखांचा मेळावा घेऊन बूथप्रमुखांसाठी आणि शाखा प्रमुखांसाठी त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करणारी त्यांच्या जीवनाशी निगडित असलेली एक योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणत आहेत, अशी मोठी घोषणा शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे केली आहे. पण लाडकी बहीण योजनेसारखं नाही, असंही सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे आज एनडीए सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत, असंही उदय सामंत म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजना सावंत, संजय परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे देशातले एकमेव असे नेते आहेत की त्यांनी पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचा विचार करून ते योजना आणत आहेत. लाडकी बहीण योजनेसारखं नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी ‘मी नाहीतर प्रत्येकाला BLO ला असं वाटेल की प्रत्येकाच्या खात्यातच पैसे येतील, तशी ही योजना नाही. परंतु जे BLO प्रामाणिक काम करतायत, जे शाखाप्रमुख काम करतायत, त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाची एक योजना या संपूर्ण शिवसेना पक्षाच्या मार्फत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत, असं उदय सामंत यांनी सांगितलं. Uddhav Thackeray : 12 नगरसेवक फुटण्याची भीती, ठाकरे स्वतः रिंगणात, मातोश्रीवर ‘वन टू वन’ चर्चा, एकनिष्ठपणाची परीक्षा
‘एकनाथ शिंदे एनडीए तीन नंबरचे नेते’
“आपल्याला आठवत असेल 2-3 महिन्यांपूर्वी माझी एक पत्रकार परिषद तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल. मी जबाबदारीनं सांगितलं होतं, की शिंदे साहेब जे मुख्यमंत्री होते, आज आपले विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, पण भविष्यामध्ये या NDA सरकार मधले तीन नंबरचे नेते हे एकनाथ शिंदे असतील, आज आपल्या देशाच्या NDA च्या तीन नंबरच्या अध्यक्ष पदावर ते विराजमान झालेले आहेत. त्यांच्यामुळे आपलं नेतृत्व हे महाराष्ट्राचं नेतृत्व तर आहेच, परंतु देशाच्या पातळीवर कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे चमत्कार घडवू शकतात, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं” अशा शब्दात सामंत यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याने केलेलं बीएलएच काम हे आदर्शवत असून दीपक केसरकर, निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम मोठे आहे. हे काम पाहून पाहून पुढच्या जिल्ह्याला सांगावं याकरता मी आलो आहे, आढावा घ्यायला नाही” असे म्हणत त्यांनी यावेळी निलेश राणे यांच्या कामाचे कौतुक केलं.
हेल्थ मधल्या काही मंडळींना आपण प्राधान्य देतोय, स्पोर्ट्स मध्ये आपण सिंधूरत्न योजना राबवतोय. त्याच्यामुळं या योजनेतनं अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना या आपण सिंधुदुर्गवासीयांपर्यंत पोहचू शकतो. पालकमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत माझं आणि पालकमंत्रींचं देखील कालच बोलणं झालं, चर्चा झाली की आज आपल्याला कोकणातल्या या दोन जिल्ह्यातल्या लोकांना जर स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल, तर सिंधूरत्न योजनेसारखी दुसरी कुठचीही उपयुक्त योजनाही आपल्या शासनात आपल्याजवळ नाही. तर या योजनेचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं Sunetra Pawar : अजित दादांच्या निधनाने पोकळी, सुधारणात्मक उपायांची गरज, प्रफुल पटेल यांचं उघड भाष्य; सुनेत्रा पवारांना NCP तूनच विरोध
राऊत यांचा घरच्यांनीच कार्यक्रम केला : निलेश राणे
माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात त्यांची सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे बघा ज्यांनी राणे यांचा आयुष्यभर केवळ तिरस्कार आणि तिरस्कार केला त्याच विनायक राऊत यांचा आज घरच्यांनीच कार्यक्रम केला आहे. आमची बदनामी करण्यामध्ये ते किती वर्ष किती वेळ घालवायचे. मला जे काही बाहेरुन कळले आहे आता अजून भरपूर आहे, जे कुंपणावर होते आणखी काही लोकं त्यांच्यावरच उलटणार आहेत, ही नियती असते” अशा शब्दात निलेश राणे यांनी सुनावले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा