Headlines

फॅन्सला इज्जत देतो; पण ते डोक्यावर बसतात म्हणणाऱ्या सुरजच्या बायकोचे नवीन फोटोशूट पाहिलंत का?,डिझायनर गाऊनची एकच चर्चा – bigg boss marathi fame suraj chavan wife sanjana chavan maternity photoshoot in gown


‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. नुकतेच चाहत्यांबद्दल केलेल्या त्याच्या वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच पत्नी संजना चव्हाणच्या मॅटर्निटी फोटोशूटने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. डिझायनर गाऊनमधील तिच्या एलिगंट लूकचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.

Suraj Chavan Wife Sanjana Chavan,
फोटो सौजन्य :-@makeover_by_adiii
‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. आपल्या साधेपणामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारा सूरज नुकताच एका मुलाखतीत चाहत्यांविषयी बोलताना म्हणाला होता की, “फॅन्सला इज्जत देतो; पण काही जण डोक्यावर बसतात.” त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. याच दरम्यान आता सूरजची पत्नी संजना चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण म्हणजे तिचे नुकतेच समोर आलेले मॅटर्निटी फोटोशूट. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये संजना अतिशय आकर्षक डिझायनर गाऊनमध्ये दिसत असून तिच्या या लूकचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. (फोटो सौजन्य :-@makeover_by_adiii)

1

1

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

संजनाचे फोटो समोर येताच चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. “खूप सुंदर”, “मराठमोळी क्वीन”, “गॉर्जियस मॉम-टू-बी”, “देव तुमच्या बाळाला आशीर्वाद देवो”, अशा अनेक शुभेच्छा चाहत्यांनी दिल्या आहेत. काही चाहत्यांनी संजना आणि सूरजची जोडी “मेड फॉर इच अदर” असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी या फोटोशूटचे कौतुक करत ते अत्यंत क्लासी आणि एलिगंट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

फुलांची वेलीचा वापर

फुलांची वेलीचा वापर

मॅटर्निटी फोटोशूटसाठी निवडलेला सेटही तितकाच आकर्षक होता. सेटवर नाजूक फुलांच्या वेलींचा वापर करून सुंदर आणि आल्हाददायक वातावरण तयार करण्यात आले होते. पांढऱ्या व गुलाबी छटांतील फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण फोटोशूटला एक रोमँटिक आणि एलिगंट लूक मिळाला. या फुलांच्या वेलींच्या पार्श्वभूमीत संजना चव्हाणचा डिझायनर गाऊन अधिक खुलून दिसत होता.

गोल्डन वॉच

गोल्डन वॉच

संजना चव्हाणने आपल्या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये डिझायनर गाऊनसोबत गोल्डन रंगाचे मनगटी घड्याळ (गोल्डन वॉच) परिधान केले होते. या साध्या पण आकर्षक अॅक्सेसरीमुळे तिचा संपूर्ण लूक अधिक उठून दिसत होता. मिनिमल ज्वेलरी, हलका मेकअप आणि गोल्डन वॉच यांचे सुंदर संयोजन तिच्या एलिगंट स्टाइलमध्ये भर घालत होते. फुलांच्या वेलींच्या सजावटीत आणि सौम्य प्रकाशयोजनेत टिपलेले हे फोटो चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत असून, तिच्या फॅशन सेन्सचेही सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

सिंपल मेकअप

सिंपल मेकअप

संजना चव्हाणने या मॅटर्निटी फोटोशूटसाठी अतिशय सिंपल आणि नैसर्गिक मेकअपची निवड केली होती. हलका बेस, न्यूड लिपस्टिक आणि सौम्य आय मेकअपमुळे तिच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज अधिक खुलून दिसत होते. डिझायनर गाऊन, मोकळे केस आणि मिनिमल अॅक्सेसरीजसोबत केलेल्या या साध्या मेकअपने तिच्या एलिगंट लूकला चारचाँद लावले. तिच्या या सहजसुंदर स्टाइलचे सोशल मीडियावरही भरभरून कौतुक होत आहे.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा