Tukaram Mundhe’s FDA Action On Goras Bhandar खंडपीठानं झापलं, आता नोटीस देणार – the bench reprimanded tukaram mundhe’s fda action against goras bhandar.
Tukaram Mundhe’s FDA Action On Goras Bhandar खंडपीठानं झापलं, आता नोटीस देणार – the bench reprimanded tukaram mundhe’s fda action against goras bhandar.
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अर्थात FDAची सूत्रे हाती घेतल्यापासून एकच नाव चर्चेत आहे. विभागाचे आयुक्त IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचं… अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभर कारवाया सुरू झाल्या आणि घडाळ्याच्या काट्याप्रमाणे दोषी असणाऱ्यांवर कारवाया आणि गुन्हे दाखल झाले. अशीच एक कारवाई ३१ मे २०२६ ला जिल्ह्याची ओळख असलेल्या वर्ध्यातील मगनवाडीमधील प्रसिद्ध गो संवर्धन गोरस भंडारवर करण्यात आली… यानंतर सुरू झाला तुकाराम मुंडे विरुद्ध वर्ध्यातील गोरस भंडारचा संघर्ष… तुकाराम मुंढेंच्या विभागाकडून कोणतीही नोटीस न देता थेट कारवाई झाल्यानं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहचलं. सुनावणीत या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिकाऱ्यांची कानउघाडनी केली केलीय. दरम्यान पहिल्यांदाच अशा कारवाईवर आव्हान दिल्यानं ही कारवाई संशयाच्या आणि वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, मुंढेंच्या मार्गदर्शनात टाकलेल्या छाप्यात काय झालं होतं, वर्ध्यातील गोरस भंडार नागपूर खंडपीठात गेल्यानंतर न्यायलयानं काय म्हटलं आणि FDA नं माघार घेत कोणती तयारी दर्शवली आहे हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमाधून पाहणार आहोत.