Multibagger Stock Returns: भारताचे श्रीमंत उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या स्टरलाइट टेक्नॉलॉजीज – STL – च्या स्टॉकने बाजारात खळबळ उडवून दिली आहे आणि बाजारातील प्रत्येक गुंतवणूकदाराच्या ओठावर सध्या या मल्टीबॅगर स्टॉकचीच चर्चा रंगली आहे. या स्टॉकमुळे अवघ्या काही दिवसातच एक लाखांची गुंतवणूक 5.5 लाख रुपये झाली आणि गुंतवणूकदारांना प्रचंड नफा झाला.

म्हणजे अनिल अग्रवाल यांचा कमी चर्चित स्टॉकने फक्त सहा महिन्यात लक्षणीय मल्टीबॅगर परतावा दिला. अशाप्रकारे, तुम्ही सहा महिन्यांपूर्वी अनिल अग्रवाल यांच्या या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 2 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमची गुंतवणूक 11 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असेल. पण प्रश्न असा आहे की, अनिल अग्रवाल यांच्या कोणत्या कंपनीने अवघ्या सहा महिन्यांत इतका प्रचंड परतावा दिला?
Donald Trump: एका वर्षात 132 हजार कोटींची कमाई… डोनाल्ड ट्रम्प यांनी इतका पैसा कुठून आणला? US राष्ट्राध्यक्षांच्या क्रिप्टो खेळीने वादंग
सहा महिन्यात 5.5 लाख रुपयांचा परतावा
अनिल अग्रवाल यांच्या स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने सहा महिन्यांत 500% पेक्षा जास्त परतावा दिला आणि गुंतवणूकदारांचा खिसा भरला. मागील सहा महिन्याच्या काळात या स्टॉकने लक्षणीय परतावा दिला मात्र, मागील पाच दिवसांपासून 3.50% घट नोंदवली गेली आहे. सहा महिन्यांपूर्वी म्हणजे 5 जानेवारी 2026 राजी स्टरलाइट टेक्नॉलॉजीजचे शेअर्स अवघ्या 102.8 रुपयांवर व्यवहार करत होते, तर आज याच स्टॉकची किंमत 500 रुपयांपुढे 573 रुपयांवर उसळली आहे. केवळ सहा महिन्यांत हा छुपारुस्तम स्टॉक मल्टीबॅगर ठरला आहे.
Gold Monetization Scheme: भारतीयांच्या घरांत अब्जावधींचे Gold, तिजोरीतल्या सोन्यातून होईल ‘गोल्डन’ कमाई! सरकारचा मास्टर प्लॅन Revealed!
स्टारलाईट टेकचा व्यवसाय काय?
2001 मध्ये स्टरलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दूरसंचार विभागाच्या विभाजनानंतर स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड अस्तित्वात आली. STL एक ग्लोबल डिजीटल नेटवर्क इंटिग्रेटर आहे, जे 5G, फायबर-टू-द-होम (FTTH) आणि ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क तयार करण्यासाठी आवश्यक ऑप्टिकल फायबर, विशेष केबल्स आणि एआय-सज्ज डेटा सेंटर कनेक्टिव्हिटी यांसारखे भौतिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिझाइन, उत्पादन आणि स्थापित करते.
Income Tax Filing Guide: 12 लाखांच्या पगारावर लागू शकतो इन्कम टॅक्स! अजून वेळ गेली नाही, ITR दाखल करण्याआधी जाणून घ्या छुपा नियम
पुढील काही वर्षात STL भारतातील ऑप्टिकल फायबर आणि ऑप्टिकल फायबर केबल्सची सर्वात मोठी उत्पादक कंपनी बनली असून आता ही कंपनी देश-विदेशात कार्यरत आहे. तसेच जागतिक ऑप्टिकल फायबर बाजारपेठेतही कंपनीने आपले स्थान निर्माण केले आहे. या कंपनीची नियंत्रक मालकी अब्जाधीश अनिल अग्रवाल यांच्या कॉर्पोरेट प्रमोटर ग्रुपकडे असून या प्रमोटरकडे स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये 44.44% हिस्सा आहे.
(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यास लेखक किंवा महाराष्ट्र टाइम्स व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.)

