Headlines

Tukaram mundhe fda took immediate action after complaints of live worms found in food; काजू कतलीमध्ये जिवंत अळ्या असल्याची तक्रार, FDA ने तत्काळ धाड टाकली


मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मागील दोन महिन्यांपासून राज्यभरात धडक कारवाई सुरू असून नागरिकांनाही गैरप्रकार आढळल्यास तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशातच बुलढाणा येथील रिलायन्स रिटेल लिमिटेड, ARD Cinemall, बुलढाणा येथे काजू कतलीमध्ये बुरशी व अळ्या आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी ग्राहकांकडून लक्ष्मी नारायण ब्रँडच्या काजू कतलीमध्ये बुरशीची वाढ तसेच जिवंत अळ्या आढळून आल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाकडून सदर ठिकाणी तात्काळ तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान तक्रारीत नमूद बॅचचा साठा संबंधित आस्थापनेत उपलब्ध नसल्याचे आढळून आले. मात्र त्याच उत्पादनाचा दुसरा साठा आढळून आला. सदर बॅचमधून अन्न नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे. तसंच तपासणीदरम्यान उपलब्ध साठ्यापैकी ५४ बॉक्स, एकूण ११.३४० कि.ग्रॅ. वजनाचा आणि १०,२३८ रुपये किंमतीचा काजू कतलीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने मागील दोन दिवसांत राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई केली आहे. दुग्धजन्य पदार्थांचा एकूण १३,२६,६४० रुपये किंमतीचा साठा नष्ट करण्यात आला. तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला, गुटखा विक्री, वितरण, वाहतूक प्रकरणी ११ व्यक्तींना अटक करून एकूण ६३,२०६ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. एकूण १२ हॉटेल/रेस्टॉरंट / धाबा इ. च्या तपासणी करून ८ आस्थापनांना सुधारणा नोटिस देऊन १ अन्न आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

मुंबईत हॉटेलचा परवाना निलंबित

मुंबईतील मालाड पश्चिम येथील Blink Commerce Pvt. Ltd ची ७ ऑगस्ट रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अत्यंत अस्वच्छ परिस्थिती, मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, गंजलेल्या रॅक्सवर व जमिनीवर अन्नपदार्थ ठेवणे, कोल्ड स्टोरेजची अपुरी स्वच्छता, मुदतबाह्य व छेडछाड झालेल्या पॅकेज्ड अन्नपदार्थांचा साठा तसेच FIFO/FEFO पद्धतीचे पालन न करणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या. तसेच तपासणीमध्ये अन्नपदार्थांच्या साठवणूक व हाताळणीच्या ठिकाणी कीटक व उंदीर नियंत्रणाच्या प्रभावी उपाययोजनांचा अभाव, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, स्वच्छता व देखभालीचा अभाव, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व आरोग्यविषयक नोंदींचा अभाव, आवश्यक वैयक्तिक स्वच्छता व संरक्षणात्मक साधनांचा अभाव अशा बाबीही निदर्शनास आल्या. काही अन्नपदार्थ अयोग्य स्थितीत व असंघटित पद्धतीने साठविलेले आढळून आले. येथील भाजीपाला व फळांच्या साठ्यावर झुरळांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आल्याने अन्नपदार्थांच्या दूषित होण्याचा गंभीर धोका निर्माण झालेला असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले. तसेच कोल्ड रूममध्ये मुदतबाह्य व खराब छेडछाड झालेल्या पॅकेजेसचा साठा आढळून आला. त्यामुळे या हॉटेलचा परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत