Tukaram mundhe fda crackdown leads to suspension of engineering college canteen and two hotels in mumbai; तुकाराम मुंढेंचा आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनला दणका; मुंबईतील दोन हॉटेलचा परवानाही निलंबित
Tukaram mundhe fda crackdown leads to suspension of engineering college canteen and two hotels in mumbai; तुकाराम मुंढेंचा आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनला दणका; मुंबईतील दोन हॉटेलचा परवानाही निलंबित
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात धडक कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अन्न व पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तेथील अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
तपासणीत अन्नसुरक्षेसंदर्भातील विविध त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली. याशिवाय मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाच्या स्वयंपाकघरात गंभीर अस्वच्छता आढळली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे अनेक उल्लंघन निदर्शनास आल्याने हॉटेलचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
कुर्ल्यातील ‘जनता तवा अँड ग्रिल’चा परवाना निलंबित
कुर्ला पश्चिम येथील जनता तवा अँड ग्रिलमध्ये कच्चे मांस आणि पोल्ट्री उत्पादने अयोग्य पद्धतीने साठवून ठेवणे, तापमान नियंत्रणाच्या नोंदी नसणे तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. या गंभीर त्रुटींमुळे संबंधित आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाने १८ ऑगस्ट रोजी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवत दूध व दुग्धजन्य पदार्थांसह विविध अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित पान मसाला, गुटखा आदींविरोधात व्यापक कारवाई केली. या मोहिमेत २५ लाख ३० हजार ६११ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या प्रकरणांमध्ये आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून १० जणांना अटक करण्यात आली आहे.
मुरबाडमध्ये हॉटेल, बेकरी बंद
अस्वच्छता आणि सुरक्षा मानकांचे पालन न केल्याचा ठपका ठेवून एफडीएने अलीकडेच मुरबाडमधील हॉटेल स्वामी समर्थ आणि न्यू बंगलोर अय्यंगार बेकरीवर कारवाई केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर ग्रामीण भागातील अन्नपदार्थांच्या सुरक्षेबाबत अधिकारी आणि कर्मचारी सतर्क झाले आहेत. मुरबाडच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या हॉटेल स्वामी समर्थमध्ये अन्न सुरक्षा विभागाने धाड टाकली असता, तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याचे आढळून आले. ते तात्काळ बंद करण्यात आले. तसेच कोणत्याही परवान्याशिवाय अय्यंगार बेकरी सुरू असल्याचे तपासणीत उघड झाले. तिथेही कोणत्याही प्रकारची स्वच्छता ठेवण्यात येत नव्हती. बेकरीही तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न व औषध विभागातील अधिकाऱ्यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा