Headlines

Trisha Krishnan वर द्विअर्थी टिप्पणी; इथं आणखी खालची पातळी गाठली गेली,कंगना रणौत, चिन्मयी श्रीपदा यांचा उदयनिधि स्टॅलिन यांच्यावर संताप


Udhayanidhi Stalin Double Meaning Comment Row: तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते त्रिशा कृष्णन यांच्यावर अतिशय आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधि स्टॅलिन यांना पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर त्यांची सुटका झाली असली तरी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Udhayanidhi Stalin Double Meaning Comment Row
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: डीएमके नेते आणि तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधि स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर केलेल्या कथित द्विअर्थी आणि अतिशय आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय तसंच चित्रपट वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतसह प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी उदयनिधि स्टॅलिन यांच्यावर कडक शब्दांत टीका करत जोरदार निशाणा साधला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तंजावर इथं कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर आयोजित आंदोलनात जनतेला संबोधित करताना उदयनिधि स्टॅलिन बोलत होते.भाषणादरम्यान जमावातून काही लोकांनी अचानक अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचं नाव घेण्यास सुरुवात केली. यावर प्रतिक्रिया देताना स्टॅलिन यांनी एक विधान केलं, जे अतिशय द्विअर्थी अन् आक्षेपार्ह होतं. जरी नंतर स्टॅलिन यांनी आपला रोख केवळ कावेरीच्या पाण्याकडं होता असा दावा केला असला, तरी या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला.

Maharashtra TimesUdhayanidhi Stalin Detained: तामिळनाडूचे राजकारण तापलं, CM विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी, माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात

सभ्य समाजात हे सहन केलं जाणार नाही: कंगना रणौत

या वादावर अभिनेत्री व खासदार कंगना रणौतहिनं इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी उदयनिधि स्टॅलिन यांच्यावर केलेल्या अटकेच्या कारवाईचे समर्थन करत कंगना म्हणाली की, कोणत्याही सभ्य समाजात सार्वजनिक ठिकाणी अशी घाणेरडी भाषा, द्विअर्थी आणि आक्षेपार्ह विनोद खपवून घेतले जाणार नाहीत. या गुन्ह्यासाठी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यत आलं; ते जामिनावर बाहेर आले असतील, तरीही ही कारवाई एक चांगला पायंडा पाडणारी आहे.

विनाकारण महिलांना राजकारणात खेचणं बंद करा:चिन्मयी श्रीपदा

तर गायिका चिन्मयी श्रीपदा हिनं देखील ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत राजकीय व्यासपीठांवरून समोरच्याव टीका करताना महिलांचा वापर करण्याच्या मानसिकतेवर ताशेरे ओढले. चिन्मयी म्हणाली की, मूळ मुद्द्यांवर लक्ष द्या. राजकारण्यांनी स्वतःच्या राजकीय समीकरणांमध्ये किंवा भांडणांमध्ये संबंध नसलेल्या महिलांना ओढण्याऐवजी प्रत्यक्ष मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं तर बरं होईल. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये अशा भाषेचं उदात्तीकरण झालं असलं, तरी नव्या पिढीकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा असते. पण इथं आणखी खालची पातळी गाठली गेली आहे. राजकीय मंचावर मिळणाऱ्या शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी महिलांचा वापर करणं अत्यंत दुर्दैवी आहे.

याशिवाय अभिनेत्री व नेत्या खुशबू सुंदर यांनीही स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना त्रिशाची बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली आहे.

Maharashtra TimesMilind Gawali: ती मरणाच्या दारात जाताना मला दिसत होती, म्हणून २० वर्षात साखर खाल्ली नाही; मिलिंद गवळींनी सांगितला भावुक प्रसंग
स्टॅलिन यांच्यावर गुन्हा दाखल; पोलिसांकडून कारवाई

या वक्तव्यानंतर वाढता वाद आणि तक्रारींनंतर तामिळनाडू पोलिसांनी उदयनिधि स्टॅलिन यांच्यावर महिलांचा अवमान करणं व इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून त्यांना चेन्नईतील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं. ताब्यात घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्टॅलिन यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा केला असून, न्यायालयात कायदेशीर लढा देणार असल्याचं म्हटलं आहे.