Headlines

Trimbakeshwar Temple Nashik: त्र्यंबक मंदिरातील लाडू प्रसाद गायब, मंदिर परिसरात अनेक दिवसांपासून वितरण बंद


Trimbakeshwar Temple Nashik: ३० मार्च २०२५ पासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर ट्रस्टने लाडू प्रसादाचे वाटप करणे सुरू केले होते. दोन लाडू असलेले एक पॅकेट २० रुपयांना विक्री केले जात होते.

trimbakeshwar temple nashik
त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे दिला जाणारा बुंदीच्या लाडूचा प्रसाद गेल्या काही दिवसांपासून बंद झाला आहे. मंदिर ट्रस्टने अचानक त्याचे वितरण बंद केले आहे. याबाबत मंदिर प्रशासनाने कुठलेही कारण दिलेले नाही. याबाबत स्पष्टपणे कोणीही बोलत नसले, तरी यामागे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या कारवाईच्या धाकाने हा लाडू प्रसाद बंद झाल्याचे खासगीत बोलले जात आहे.

दिवसाकाठी साधारण पाच हजार लाडू पॅकेट्‌सची विक्री केली जात आहे. मात्र, मागच्या पंधरा दिवसांत ट्रस्टतर्फे अचानक लाडू विक्री बंद करण्यात आली आहे. याबाबत स्पष्टपणे कोणीही बोलत नसले, तरी यामागे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धाकाने हा लाडूप्रसाद बंद झाल्याचे खासगीत सांगितले जात आहे.

Maharashtra TimesGokul Gite : नाशकात शिंदेसेनेचा गेम, अपक्ष गोकुळ गितेंचा विजयाचा गुलाल; पराभवानंतर शिंदेंची नवी खेळी, एका फोनवर बाजू पालटणार?
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मुटकुळ्याचे लाडू प्रसाद म्हणून देण्यासाठी निविदा सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. तथापि चेअरमन म्हणून सहधर्मदाय आयुक्त यांनी कारभार हाती घेण्यापूर्वी देवस्थान ट्रस्टने सध्या बुंदीच्या लाडूचा प्रसाद पुरवठा करणाऱ्या मक्तेदाराला तीन महिन्यांची मुदतवाढ दिलेली होती. तथापि राज्यात तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईनंतर अचानकपणे त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणारा लाडूचा प्रसाद बंद झाला आहे. त्यासाठी मंदिर प्रांगाणात ठेवण्यात आलेली टपरी बंद अवस्थेत आहे.

३० मार्च २०२५ पासून ट्रस्टतर्फे लाडूचा प्रसाद देण्यात येतो. त्यासाठी निविदा काढून पुरवठादार नेमण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टला दोन बुंदीच्या लाडुूचा बॉक्स १६ रुपयांना मिळत होता आणि देवस्थान ट्रस्ट २० रुपयांना त्याची विक्री करीत असे. दररोज पाच हजार पॅकेट विक्रीतून देवस्थान ट्रस्टला २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. महिन्याकाठी सहा लाख रुपये उत्पन्न देणारा हा प्रसाद अचानक का बंद करण्यात आला याचे कुतूहल मंदिर परिसरात निर्माण झाले आहे. आतापर्यंत किमान एक कोटी रुपये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला या लाडू विक्रीच्या माध्यमातून मिळाले आहेत.

Maharashtra TimesNashik Gokul Gite : अखेर फैसला झाला, आमदारकीची माळ गोकुळ गितेंच्या गळ्यात; जिंकताच एकनाथ शिंदेंचा कॉल
कारवाईचा धाक ?
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धाकाने जर हा लाडू प्रसाद बंद करण्यात आला असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर अशी आहे. यापूर्वी साधारणत: २५ लाख लाडू विकले गेले ते अन्न आणि औषध प्रशासनाचे मानांकन पूर्ण करणारे नव्हते का? असा संदेश त्यामधून जात आहे. भाविकांच्या आरोग्याशी खेळ झाल्याचा निष्कर्श त्यामधून निघाल्यास नवल वाटायला नको. देवस्थान ट्रस्टने या लाडूंच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची कमाई केली; मात्र भाविकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले का? अशी चर्चाही आता येथे होत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा