Headlines

Tiger vs Bear Dramatic Jungle Face Off Ends in an Unexpected Way in Ranthambore National Park | वाघानं हल्ला करताच अस्वलानं केला पलटवार, मृत्यूच्या खेळात कोण जिंकेल? लढाईचा शेवट पाहून व्हाल हैराण, व्हिडीओ व्हायरल


Wildlife Viral Video: रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात वाघ आणि अस्वल आमनेसामने आले. या संघर्षात अखेर कोण बाजी मारली, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हायरल व्हिडिओ पाहा. या व्हिडिओमध्ये जंगलातील दोन बलाढ्य प्राण्यांची समजूतदार वर्तणूक आणि संघर्ष टाळण्याची वृत्ती पाहायला मिळेल.

Ranthambore National Park
(फोटो सौजन्य – ranthamborejunglesafari/Instagram)
वाघ हा किती खतरनाक शिकारी आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. जेव्हा जेव्हा शक्तीचा उल्लेख केला जातो, तेव्हा तेव्हा वाघाचं उदाहरण दिलं जातं. यावरूनच त्याच्या ताकदीचा अंदाज येतो. मात्र, अस्वलही काही कमी नाही. किंबहुना तोही तितकाच ताकदवान आणि आक्रमक प्राणी आहे. त्याच्याकडेही वाघासारखीच प्रचंड ताकद असते. शिवाय आपल्या क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी तो सिंहाशीही भिडायला मागेपुढे पाहत नाही. मग विचार करा, हे दोन बलाढ्य प्राणी समोरासमोर आले तर काय होईल? हीच घटना रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात पाहायला मिळाली. वाघ आणि अस्वल आमनेसामने आले. मात्र, या संघर्षाचा शेवट कसा झाला, हे आता तुम्हीच पाहा.

शेवटी कोण जिंकलं?

शेवटी कोण जिंकलं?

हा व्हिडिओ ranthamborejunglesafari या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये वाघ आणि अस्वल आमनेसामने आल्याचं दिसतं. एक वाघ शांतपणे बसलेला असताना त्याच्या नजरेसमोरून एक अस्वल जात होतं. अस्वलाला पाहताच वाघ सावध झाला. कारण अस्वलही तितकाच धोकादायक प्राणी आहे. आपल्या क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी वाघ पुढे सरसावला. वाघ समोर येताना पाहून कोणताही प्राणी घाबरला असता. मात्र, अस्वल पळून जाण्याऐवजी लढाईच्या पवित्र्यात उभं राहिलं. त्यानं डोळ्याला डोळा भिडवत वाघाला आव्हान दिलं. अस्वलाचा आवेश पाहून वाघानंही आपला आक्रमकपणा कमी केला. बहुधा अस्वलही लढाईच्या तयारीत नव्हतं. त्यामुळे ते शांतपणे मागे फिरलं आणि वाघही आपल्या जागेवर परतला.
(फोटो सौजन्य – ranthamborejunglesafari/Instagram)

लढाईमध्ये घडलं काय?

​ ​

वाघ कितीही शक्तिशाली असला तरी तो आपली ताकद विनाकारण वापरत नाही. हीच गोष्ट अस्वलाच्या बाबतीतही लागू पडते. दोघेही आपल्या शक्तीचा वापर प्रामुख्यानं अन्न मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी करतात. केवळ ताकद आहे म्हणून ते प्रत्येकाशी संघर्ष करत नाहीत. विशेषतः समोर तितकाच बलाढ्य प्रतिस्पर्धी असेल, तर शक्यतो संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण अशा लढाईत ते स्वतःही गंभीर जखमी होऊ शकतात. दुखापतीतून सावरण्यासाठी त्यांना अनेक महिने लागू शकतात. त्या काळात अन्न मिळालं नाही, तर त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. शिवाय त्यांच्या प्रदेशावर दुसरा प्राणीही कब्जा करू शकतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये दोघांनीही एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत संघर्ष टाळणंच पसंत केलं.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा