Headlines

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; मोहफुल वेचायला गेली असताना घडली घटना, परिसरात घबराट – gondia woman died in tiger attack after going to collect moh flowers pri


Gondia Woman Died In Tiger Attack: शिवराम टोला येथील महिला मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. ही फुले वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

tiger death2
tiger death2(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : मोहफुले वेचायला जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार मारले. ही घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शिवराम टोलाच्या जंगलात रविवारी सकाळच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर वाघ बराच वेळ मृतदेहाजवळ बसून होता.

अनुसया धानू कोल्हे (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. शिवराम टोला येथील महिला मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. ही फुले वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हे पाहताच अन्य महिला जीवाच्या आकांताने पळाल्या. मात्र अनुसया या वाघाच्या हल्ल्यात सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
Maharashtra Timesबस चालवताना मोबाईलवर IPL पाहणं महागात; ई-शिवनेरीचा ‘तो’ चालक बडतर्फ; एसटी महामंडळाची मोठी कारवाई
या घटनेनंतर गावात दहशत पसरली आहे. गोठणगाव वनविभागाने नागरिकांना जंगलात एकटे न जाण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाकडून पीडित कुटुंबाला मदतीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. परिसरात वाघाचा वावर लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात येत आहेत.
Maharashtra Timesराज्यात ‘नव्या घरा’ची गुढी लवकरच! समूह स्वयंपुनर्विकासाबाबत निर्णय घेणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मध्यंतरी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला सध्याच्या हंगामात पहाटेच्या सुमारास मोहफुल वेचण्यासाठी जंगल परिसरात जाण्यास मनाई करणारे आदेश दिले होते. पण, मोहफुल रात्री गळून पडत असल्याने गावकरी पहाटेच मोहफुल वेचणीसाठी जातात. या घटनेनंतर गावकऱ्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून पहाटे जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन नवेगावबांधचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप पवार

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा