Headlines

Tharala Tar Mag Serial 2 July 2026 Episode ; Tharala Tar Mag : घोंघावणारं वादळ म्हणजे संकटाची नव्हे तर आनंदाची चाहूल! राकेशचा प्लॅन फसला, अपघाताच्या थरारात परतली सायलीची स्मृती, मधुभाऊही कोमातून बाहेर


Tharala Tar Mag 2 July 2026 Episode : राकेशने गाडीत छेडछाड केल्यामुळे रविराजच्या कंट्रोल बाहेर गाडी जाते. त्यामुळे पुन्हा एकदा गाडीचा स्पीड वाढतो. या काळात सायलीला पुन्हा तिचा भूतकाळ नीट आठवतो. तर मधुभाऊ सुद्धा उठून बसतात.

tharala tar mag 2 july 2026 episode
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठरलं तर मग या मालिकेच्या 2 July च्या एपिसोडमध्ये प्रतिमा आणि रविराज सोबत त्याच वाटेवरून प्रवास करत असताना सायलीला पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणी आठवतात आणि यावेळी तिला सगळ्यांचे चेहरे लख्ख दिसत असतात त्यामुळेच आपणच खरी तन्वी आहोत हे तिला समजतं. पण यावेळी वादळ आल्यामुळे पूर्णा आजी आणि मधु भाऊ मात्र अस्वस्थ झालेले असतात. काहीतरी संकट येणार आहे अशी त्यांना चाहूल लागलेली असते त्यामुळे ती दोघंही मनोमन प्रार्थना करतात. सायली खूप खुश असते.

हळूहळू सायलीला रविराज सोबतच्या आठवणी सुद्धा आठवू लागतात. त्याच्यासोबत खेळलेले खेळ, रुसून बसल्यावर त्याने भरवलेला जेवण हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येऊ लागतं. ती रविराजला म्हणते की आपण गाडीची स्पीड आणखी वाढवूया का? पण रविराजला माहित असतं की तिला स्पीडची भीती वाटते त्यामुळे तो तिला म्हणतो की तुला त्रास होईल मात्र स्वतःच सायली म्हणते की आता मला त्रास होणार नाही तुम्ही वाढवा त्यामुळे तिच्या इच्छे खातार तो स्पीड वाढवतोय. मागून अर्जुन ची गाडी येतच असते. रविराज च्या गाडीने अचानक स्पीड वाढवल्यामुळे त्याला कळत नाही की नक्की काय झालं? तितक्यात रविराज च्या लक्षात येतं की गाडीचा स्पीड ब्रेक लागत नसतो.‌ त्यामुळे सायली आणि प्रतिमा यांना भीती वाटू लागते. पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यासमोर 25 वर्षांपूर्वी घडलेला अपघात येतो.
Maharashtra TimesDevdatta Nage : देवदत्त नागेने डेविड वॉर्नरला भंडारा लावला, तोडक्या-मोडक्या मराठीत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची प्रतिक्रिया
पूर्णा आजी देवीसमोर प्रार्थना करत असते. तिलाही सतत वाटत असतं की काहीतरी संकट येणार आहे त्यामुळे ती घाबरलेली असते. सायली अर्जुन कुठे आहे तसा विचारताच अस्मिता तिला सांगते की ते दोघं प्रतिमा आत्याच्या घरी आहेत त्यामुळे ती लगेचच त्यांना फोन करून चौकशी करायला सांगते. सगळे सुखरूप रहावे यासाठी आजी पुन्हा एकदा देवीकडे साकडं घालू लागते.

दुसरीकडे अर्जुन ने गाडी स्पीडने घेतलेली असते. तो रविराज च्या गाडीच्या शेजारी येऊन गाडीचा ब्रेक मारायला सांगतो. पण ते वाचायला विराज त्याला कळवतो की गाडीचा ब्रेक लागत नाहीये हे ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुन तोपर्यंत रविराज ला गाडीला हॅन्ड ब्रेक मार वगैरे इंस्ट्रक्शन देत असतो. तोपर्यंत सायलीच्या डोळ्यासमोर अपघाताची सर्व दृश्य झपाझप जात असतात. अपघात झाल्यानंतर ती मधु भाऊंना कशी भेटली हे सुद्धा तिला आठवतं.
Maharashtra TimesTharala Tar Mag New Promo : घरात सून म्हणून वावरणारी सायलीच आपली 25 वर्षांपूर्वी हरवलेली खरी तन्वी! सुभेदार किल्लेदारांसमोर येणार मोठे सत्य
सायली गरोदर असल्यामुळे सगळ्यांनाच तिची काळजी वाटत असते. एवढ्या गंभीर परिस्थितीतही ते सायलीचे काळजी घेत असतात. अर्जुन रविराज ला गाडी डाव्या बाजूला घ्यायला सांगतो जिथे पालापाचोळा असतो. त्याचा एकूण रविराज लगेच गाडी वळवतो आणि त्याची गाडी थांबते. अर्जुन लगेचच तिथे जाऊन सगळ्यांची चौकशी करतो आणि त्यांना बाहेर काढतो.

दुसरीकडे संकटाची चाहूल लागल्यामुळे मधु भाऊंना सुद्धा असह्य होतं आणि ते आपली इच्छाशक्ती पणाला लावून जागेवरून हलतात. साधारण वर्षभरानंतर मधु भाऊ स्वतःहून हालचाल करून उठून बसलेले असतात. कुसुमताई जेव्हा त्यांना औषध द्यायला बाहेर येते तेव्हा तिला मधु भाऊ उठून बसलेले दिसतात आणि तिला सुद्धा मोठा धक्का बसतो. सुभेदारांच्या घरी ही तुम्हाला येऊन सायली अर्जुन कुठे आहेत याची चौकशी करत असते. कोणाचाही फोन लागत नसल्यामुळे घरात चिंतेच्या वातावरण असतं.

पण सायलीच्या चेहऱ्यावर समाधान असतं कारण तिला सगळं आठवलेलं असतं. आपल्या डोळ्यासमोर आपले खरे आई-वडील आहेत हे तिला समजलेलं असतं. ती डोळ्यांनीच अर्जुन ला इशारा कडून सर्व सांगते पण यावेळी ती प्रतिमा आणि रविराज ला सांगण्यात टाळते. त्यानंतर घरून फोन येत आहेत हे त्यांच्या ध्यानात येतात असे ते लगेचच घरचे काळजी करत असतील म्हणून तिथून निघतात.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा