Tharala Tar Mag 2 July 2026 Episode : राकेशने गाडीत छेडछाड केल्यामुळे रविराजच्या कंट्रोल बाहेर गाडी जाते. त्यामुळे पुन्हा एकदा गाडीचा स्पीड वाढतो. या काळात सायलीला पुन्हा तिचा भूतकाळ नीट आठवतो. तर मधुभाऊ सुद्धा उठून बसतात.

हळूहळू सायलीला रविराज सोबतच्या आठवणी सुद्धा आठवू लागतात. त्याच्यासोबत खेळलेले खेळ, रुसून बसल्यावर त्याने भरवलेला जेवण हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येऊ लागतं. ती रविराजला म्हणते की आपण गाडीची स्पीड आणखी वाढवूया का? पण रविराजला माहित असतं की तिला स्पीडची भीती वाटते त्यामुळे तो तिला म्हणतो की तुला त्रास होईल मात्र स्वतःच सायली म्हणते की आता मला त्रास होणार नाही तुम्ही वाढवा त्यामुळे तिच्या इच्छे खातार तो स्पीड वाढवतोय. मागून अर्जुन ची गाडी येतच असते. रविराज च्या गाडीने अचानक स्पीड वाढवल्यामुळे त्याला कळत नाही की नक्की काय झालं? तितक्यात रविराज च्या लक्षात येतं की गाडीचा स्पीड ब्रेक लागत नसतो. त्यामुळे सायली आणि प्रतिमा यांना भीती वाटू लागते. पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यासमोर 25 वर्षांपूर्वी घडलेला अपघात येतो.
Devdatta Nage : देवदत्त नागेने डेविड वॉर्नरला भंडारा लावला, तोडक्या-मोडक्या मराठीत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची प्रतिक्रिया
पूर्णा आजी देवीसमोर प्रार्थना करत असते. तिलाही सतत वाटत असतं की काहीतरी संकट येणार आहे त्यामुळे ती घाबरलेली असते. सायली अर्जुन कुठे आहे तसा विचारताच अस्मिता तिला सांगते की ते दोघं प्रतिमा आत्याच्या घरी आहेत त्यामुळे ती लगेचच त्यांना फोन करून चौकशी करायला सांगते. सगळे सुखरूप रहावे यासाठी आजी पुन्हा एकदा देवीकडे साकडं घालू लागते.
दुसरीकडे अर्जुन ने गाडी स्पीडने घेतलेली असते. तो रविराज च्या गाडीच्या शेजारी येऊन गाडीचा ब्रेक मारायला सांगतो. पण ते वाचायला विराज त्याला कळवतो की गाडीचा ब्रेक लागत नाहीये हे ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुन तोपर्यंत रविराज ला गाडीला हॅन्ड ब्रेक मार वगैरे इंस्ट्रक्शन देत असतो. तोपर्यंत सायलीच्या डोळ्यासमोर अपघाताची सर्व दृश्य झपाझप जात असतात. अपघात झाल्यानंतर ती मधु भाऊंना कशी भेटली हे सुद्धा तिला आठवतं.
Tharala Tar Mag New Promo : घरात सून म्हणून वावरणारी सायलीच आपली 25 वर्षांपूर्वी हरवलेली खरी तन्वी! सुभेदार किल्लेदारांसमोर येणार मोठे सत्य
सायली गरोदर असल्यामुळे सगळ्यांनाच तिची काळजी वाटत असते. एवढ्या गंभीर परिस्थितीतही ते सायलीचे काळजी घेत असतात. अर्जुन रविराज ला गाडी डाव्या बाजूला घ्यायला सांगतो जिथे पालापाचोळा असतो. त्याचा एकूण रविराज लगेच गाडी वळवतो आणि त्याची गाडी थांबते. अर्जुन लगेचच तिथे जाऊन सगळ्यांची चौकशी करतो आणि त्यांना बाहेर काढतो.
दुसरीकडे संकटाची चाहूल लागल्यामुळे मधु भाऊंना सुद्धा असह्य होतं आणि ते आपली इच्छाशक्ती पणाला लावून जागेवरून हलतात. साधारण वर्षभरानंतर मधु भाऊ स्वतःहून हालचाल करून उठून बसलेले असतात. कुसुमताई जेव्हा त्यांना औषध द्यायला बाहेर येते तेव्हा तिला मधु भाऊ उठून बसलेले दिसतात आणि तिला सुद्धा मोठा धक्का बसतो. सुभेदारांच्या घरी ही तुम्हाला येऊन सायली अर्जुन कुठे आहेत याची चौकशी करत असते. कोणाचाही फोन लागत नसल्यामुळे घरात चिंतेच्या वातावरण असतं.
पण सायलीच्या चेहऱ्यावर समाधान असतं कारण तिला सगळं आठवलेलं असतं. आपल्या डोळ्यासमोर आपले खरे आई-वडील आहेत हे तिला समजलेलं असतं. ती डोळ्यांनीच अर्जुन ला इशारा कडून सर्व सांगते पण यावेळी ती प्रतिमा आणि रविराज ला सांगण्यात टाळते. त्यानंतर घरून फोन येत आहेत हे त्यांच्या ध्यानात येतात असे ते लगेचच घरचे काळजी करत असतील म्हणून तिथून निघतात.

