Thane News: शिळफाटा येथील खान कंपाऊंड परिसरात पूर्वी झालेल्या कारवायांनंतर भूमाफियांनी शिळ, लकी कंपाऊंड व आसपासच्या भागात पुन्हा अनधिकृतरित्या गोदामे उभारल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला.

ग्रीन झोन, उद्यान आरक्षण तसेच शैक्षणिक आरक्षणाच्या जागांवर मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत असून महापालिकेच्या महसुलालाही फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, गोदामांमधील रसायने नैसर्गिक जलप्रवाहात सोडली जात असल्याने परिसरातील विहिरी व कूपनलिका दूषित होत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे.
Kiran Pawaskar : दुसऱ्यांना सांभाळा, मुलाला सांभाळा, पाळणाघर आहे का? पावसकरांनी शिंदेंसमोरच बाळासाहेबांची खिल्ली उडवली, नंतर शिवसेनेने हात झटकले
या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोदामांचे सर्वेक्षण व निष्कासन मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी सुरू झालेली ही कारवाई रविवारी सुट्टीच्या दिवशी तसेच सोमवारीही अखंडपणे सुरू ठेवण्यात आली.
सर्वेक्षण मोहीम सुरूच
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोदामांना प्राधान्य देण्यात आले आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी अशा गोदामांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. शासकीय व आरक्षित भूखंडांवर उभारण्यात आलेल्या ८५० अनधिकृत गोदामांचे सर्वेक्षण सुरू असून नियमबाह्य आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली.
Thane News: भिवंडीतील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; कर्ज देण्याच्या नावाखाली करायचे फसवणूक, 9 जणांविरुद्ध गुन्हा
पारदर्शकता आवश्यक
प्रशासक राजवटीच्या काळात आरक्षित भूखंड, सरकारी जागा तसेच विविध मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे उभी राहिली. केवळ ठराविक ठिकाणांपुरतीच कारवाई मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. खान कंपाऊंड, आचार गल्ली, महापे रोड परिसर तसेच शिळ-दिवा रोडलगत शेकडो अनधिकृत गोदामे अस्तित्वात आहेत. मात्र कारवाई फक्त निवडक ठिकाणीच का केली जात आहे, असा आरोपही मनसेचे शिळ – देसाई विभागाध्यक्ष शरद पाटील यांनी केला. संबंधित विभागाने संपूर्ण यादी जाहीर करून या कारवाईची पारदर्शक माहिती जनतेसमोर मांडावी, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
Satara News : नाशिकमध्ये भाजपकडून कुस्ती, साताऱ्यात मात्र शिवसेनेची दोस्ती, ZP तील गोंधळानंतरही युती निभावली
पोलिस बंदोबस्तात कारवाई
महापालिका आयुक्त सौरभ राव व आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त (अतिक्रमण नियंत्रण निष्कासन) जितेंद्र निकम, उपायुक्त (परिमंडळ-१) दीपक झिंजाड तसेच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडत आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात येत आहे.

