Thane Jambhali Naka Hotel Maharaja Lodge 23 Year Old Girlfriend Killed by Boyfriend on Suspicion Affair; फेसबुकवरुन ओळख, प्रेमसंबंधात चारित्र्यावर सतत संशय, ठाण्याच्या लॉजमध्ये गर्लफ्रेंडला संपवलं; कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन बघताच थरारक दृश्य
Thane Jambhali Naka Hotel Maharaja Lodge 23 Year Old Girlfriend Killed by Boyfriend on Suspicion Affair; फेसबुकवरुन ओळख, प्रेमसंबंधात चारित्र्यावर सतत संशय, ठाण्याच्या लॉजमध्ये गर्लफ्रेंडला संपवलं; कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन बघताच थरारक दृश्य
Thane Maharaja Lodge Girl Killed : ठाणे येथील जांभळीनाका भागात काल मंगळवारी रात्री एका लॉजमध्ये तरुणीची हत्या करण्यात आली आहे. अवघ्या दोन तासात आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हॉटेल महाराजा लॉज गर्लफ्रेंडची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
महेश गायकवाड, ठाणे : ठाणे येथील जांभळी नाका परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये 23 वर्षाच्या तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपी नंदकिशोर गाडेकर (वय 27) याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. उशीने तोंड दाबून या तरुणीची हत्या केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
खोलीत जाऊन बघितलं, तर…
मुंबईतील भांडुप परिसरात मृत तरुणी राहत होती. डोंबिवलीत राहणारा आरोपी नंदकिशोर हा काल मंगळवारी दुपारी 3 वाजता जांभळी नाका येथील हॉटेल महाराजा लॉजमध्ये काही तासासाठी राहण्यास आला होता. त्याने सोबत असलेल्या 23 वर्षाच्या तरुणीची हत्या केली. रात्री 9 वाजता नंदकिशोर एकटाच लॉजमधून बाहेर पडला. याबाबत लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन बघितल्यानंतर तरुणी निपचित पडल्याचे दिसून आले. ठाणे नगर पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक लॉजमध्ये धडकले आणि चौकशी सुरु केली. हत्येचा हा प्रकार सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रेयसीचं इतर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. Navi Mumbai News : ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले
क्षुल्लक वादातून पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे. पतीनं साडी घेऊन दिली नाही या कारणावरून संतापलेल्या पत्नीने आधी पतीच्या डोक्यात प्रेशर कुकर मारला आणि त्यानंतर गळा घोटून त्याला जिवे मारलं. यावेळी त्यांचा सात वर्षांचा चिमुकला देखील घरातच होता. त्याच्यासमोर आईने वडिलांना मारल्याचं त्याने पाहिलं. पोलिसांना घटना समजताच बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला तत्काळ ताब्यात घेतलं आहे. हरेराम सिंग असं मृत्यू झालेल्या पतीचं नाव असून आरोपी पत्नीचं नाव सुनीता देवी आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा