Headlines

Thalapathy Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा काडीमोड रद्द! पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे


Thalapthy Vijay Divorce : थलपती विजयची पत्नी संगीतानं घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे.

Thalapathy Vijay Divorce
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि थलपती विजय गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांची पत्नी संगीतासोबतच्या नात्यात मतभेद असल्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. दरम्यान, विजय यांचं नाव त्रिशा कृष्णनसोबतही जोडलं गेलं होतं. अशातच आता, संगीतानं आपली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे.

Trisha-Thalapathy Vijay relationship : त्रिशा जयललितांची जागा घेणार? MGRप्रमाणे विजयसाठी ‘लेडी लक’

संगीतानं घटस्फोट मागे घेतला

ANI च्या वृत्तानुसार, संगीतानं आपले पती, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्याविरुद्ध दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. संगीतानं याचिका मागे घेतल्यानंतर, चेंगलपट्टू न्यायालयानं विजय यांच्याविरुद्ध दाखल केलेला घटस्फोटाचा खटला बंद केला.

Maharashtra TimesDimple Kapadia : ‘स्वभाव तापट, मी त्यांची वाईट बाजूही पाहिली आहे’, नाना पाटेकरांबद्दल डिंपल कपाडिया यांचं वक्तव्य

विजय आणि संगीता यांंचं लग्न

विजयनं संगीता सोरनालिंगमशी २५ ऑगस्ट १९९९ रोजी लग्न केलं. मूळची श्रीलंकन ​​तमिळ कुटुंबातील असलेली संगीता, लग्नापूर्वी विजयची चाहती होती. भेटीनंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलां. लग्नानंतर, संगीता अनेक वर्षे विजय यांच्सोयाबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसू लागली आणि तिनं त्यांच्या कौटुंबिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना दोन मुलं आहेत.

लग्नाच्या २७ वर्षांनंतर, विजय आणि संगीता यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या. २०२६ मध्ये, संगीतानं चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, संगीतानं तिच्या घटस्फोटाच्या याचिकेत विजय यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या याचिकेत सीएम विजय यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करण्यात आला असून, विजय यांचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा करण्यात आलेला. पण, विजय यांनी या आरोपांवर मौन बाळगलं. सुनावणी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आणि न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या उपस्थितीबाबत निर्देश जारी केले. याच काळात, विजय यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत वेगाने प्रगती केली आणि ते तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनले.