Headlines

technical snag forces helicopter emergency landing at kelve road school ground; पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; तांत्रिक बिघाड असूनही पायलटच्या निर्णयामुळे जीवितहानी टळली, चार जीव वाचले…


तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग, केळवे रोड येथील शाळेच्या खुल्या मैदानात करण्यात आली इमर्जन्सी लँडिंग. मुंबईतील जुहू येथून सुरतच्या दिशेने निघाले होते हेलिकॉप्टर

Helicopter Emergency Landing Palghar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नमित पाटील, पालघर: तांत्रिक बिघाड झाल्याने एका हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना केळवे रोड परिसरात घडली आहे. पायलटने प्रसंगावधान राखत शाळेच्या खुल्या मैदानात हेलिकॉप्टरची लँडिंग सुरक्षितपणे केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.

नेमकं काय घडलं?

सुरत येथे सरावासाठी एक हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथून निघाले होते. पालघर जिल्ह्यातील केळवे रोड, सफाळे दरम्यान आल्यानंतर या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा सिग्नल मिळाला. पायलटच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याने तातडीने परिसरात जवळच असलेले खुले मैदान शोधले. त्यानंतर या हेलिकॉप्टरची केळवे रोड येथील विद्या वैभव हायस्कूलच्या खुल्या मैदानात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. शाळेच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरले असल्याची बाब स्थानिकांनी पाहिल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. सफाळे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदतीबाबत हेलिकॉप्टर मधील पायलट व इंजिनिअर यांना विचारणा करण्यात आली.

चार जण वाचले

दरम्यान हेलिकॉप्टर मधील पायलट आणि इंजिनिअर यांनी तांत्रिक पथकाशी विमानामधील बिघाडा बाबत संपर्क साधला. त्यानंतर हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर सुरतच्या दिशेने न जाता जुहू येथील मुख्य कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये ज्युनियर पायलट, सीनियर पायलट, इंजिनियर तसेच आणखी एक व्यक्ती असे एकूण चार जण प्रवास करत होते.

Maharashtra TimesImtiaz Jaleel : ‘घोटाळे बाहेर काढले म्हणून मला अडकवलं’; इम्तियाज जलील यांचा पालकमंत्री संजय शिरसाटांवर थेट प्रहार

हेलिकॉप्टरच्या पायलटने प्रसंगावधान राखत वेळीच खुल्या मैदानात हेलिकॉप्टर लँड केल्याने मोठा अनर्थ टळला. शाळेच्या मैदानात उतरलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.

जुहूकडे पुन्हा रवाना

तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर आपत्कालीन परिस्थितत केळवे रोड येथील शाळेच्या मैदानात उतरवण्यात आले होते. तांत्रिक बिघाड दुरुस्त करून पुन्हा हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जुहूकडे रवाना झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अशी माहिती सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी दिली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा