Headlines

Tanya Puri : ‘विवाहित असूनही निम्म्या वयाच्या मुलींसोबत संबंध ठेवतो’, डिटेक्टिव्हनं केली बॉलिवूड अभिनेत्याची पोलखोल


Tanya Puri On Actor : डिटेक्टिव्ह तान्या पुरीनं एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड अभिनेत्याची पोलखोल केली आहे.

Tanya Puri On Bollywood Actor
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा अडचणी असतात. काही स्टार जोडपी त्यांचं नातं चांगलं नसतानाही एकत्र राहतात. ते आपल्या मुलांसाठी किंवा सामाजिक टीका टाळण्यासाठी परिस्थितीशी तडजोड करतात. आता, खाजगी गुप्तहेर तान्या पुरीनं एका बॉलिवूड जोडप्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की, एका अभिनेत्याच्या पत्नीनं तिच्या नवऱ्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला होता.

तान्या पुरीनं केली अभिनेत्याची पोलखोल

झहरा जानीसोबतच्या एका मुलाखतीत तान्या पुरी नं सांगितलं की, तो अभिनेता ‘ग्रीन फ्लॅन’ आहे. त्या अभिनेत्याची प्रतिमा खूप चांगली आहे. त्याचं वैवाहिक जीवनही परिपूर्ण दिसतं. तो आपल्या मुलांसाठी एक उत्तम वडील आहे. तान्या पुरी म्हणाली, ‘त्या अभिनेत्याच्या पत्नीनं माझ्याशी संपर्क साधला. कारण, तिला तिच्या पतीबद्दलचं सत्य जाणून घ्यायचं होतं. ती बऱ्याच काळापासून याचा विचार करत होती.’

Maharashtra TimesKangana Ranaut : जेन झी आमची सर्वात मोठी ताकद, त्यांच्यामुळेच आम्ही सत्तेत आहोत; ‘जनरेशन गटर’ म्हणणाऱ्या कंगनाचा यु-टर्न
चौकशी केल्यावर तान्या पुरीला समजलं की, तो अभिनेता एका फ्रँचायझी चित्रपटात काम करतो आणि तिथं अनेक तरुण अभिनेत्रींसोबत संबंध ठेवतो. तान्या पुरी म्हणाली की, ‘सिनेमामध्येही त्याचे अफेअर्स दाखवण्यात आले आहेत. पण, वैयक्तिक आयुष्यातही त्याचे निम्म्या वयाच्या मुलींसोबत संबंध आहेत.’

Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद

बॉलिवूड जोडप्याबद्दल सांगताना तान्या म्हणाली की, त्या नवरा बायकोचं एकमेकांसोबत पटत नाही, त्यांचे कोणतेही शारीरिक संबंध नव्हते. सेलिब्रिटींसाठी घटस्फोट घेणं कठीण असतं, कारण त्यांच्या प्रतिमेला धक्का लागण्याची भीती असते. तान्यानं त्या अभिनेत्याचं किंवा त्याच्या पत्नीचं नाव उघड केलं नाही.

Maharashtra TimesThalapathy Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा काडीमोड रद्द! पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे
याच मुलाखतीदरम्यान एका अभिनेत्रीबद्दल बोलताना तान्या पुरी म्हणाली की, ही सुंदर अभिनेत्री पैशांसाठी पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवते. तिच्या बॉयफ्रेंडलाही काही अडचण नाही. तान्या म्हणाली, ‘एक नायिका हॉटेल्समध्ये पुरुषांना भेटते, त्यांच्यासोबत संबंध ठेवते आणि आपली संपत्ती वाढवते. तिच्या संपूर्ण टीमला याबद्दल माहित आहे. तिचा प्रियकरसुद्धा तिच्या टीमचाच एक भाग आहे.’

Maharashtra TimesMrunal Dusanis : वडिलांच्या आग्रहाखातर लग्नासाठी घेतला पुढाकार, लग्नानंतर सात वर्ष लाँग डिस्टन्स; मृणाल दुसानिसनं सांगितला अरेंज मॅरेजचा किस्सा
दरम्यान, तान्या पुरीबद्दल सांगायचं तर ती लवकरच ‘ट्रेटर्स २’ मध्ये दिसणार आहे. हा शो १३ ऑगस्टपासून ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा