Headlines

Swati Deval : तीन वेळा गर्भपात, वैयक्तिक आयुष्यात त्रास, तरीही नाही मानली हार; मराठी अभिनेत्रीनं सांगितला कठीण काळ


Swati Deval : मराठी अभिनेत्री स्वाती देवलनं तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. अभिनेत्रीचं तीन वेळा अबॉर्शन झालेलं. त्याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

Swati Deval On Abortion
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री स्वाती देवलनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीनं स्वबळावर नाव कमावलं. ही सर्व स्वामींची कृपा असल्याचं तिनं म्हटलंय. स्वातीनं आयुष्यात कठीण काळ अनुभवला आहे. अभिनेत्रीचं अबॉर्शन झालेलं. याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

स्वाती देवलनं सांगितला कठीण काळ

मुलाखतीदरम्यान स्वाती देवल म्हणाली की, ‘मला ‘कळत नकळत’ मालिकेनंतर बरीच कामं मिळाली. मला ‘कुलवधू’ मालिकेसाठी विचारणा झालेली. पण, त्यादरम्यानच माझं पहिलं अबॉर्शन झाल्यामुळे मला ती मालिका करता नाही आली. पहिल्या बाळाच्या वेळेस अबॉर्शन झालं. दुसरं-तिसरं पण अबॉर्शन झालं. मला यादरम्यान, खरंच खूप त्रास झाला होता. ती संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी खूप वाईट आणि त्रासदायक होती. पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला जेव्हा समजलं की, असा-असा प्रॉब्लेम आहे तेव्हा तुषार कॉमेडी एक्स्प्रेस शो करत होता. तर त्यावेळी तुषार ‘वॉटर किंगडम’ला शूट करत होता आणि डॉक्टरकडे मी एकटीच गेले होते. डॉक्टरांनी मला सांगितलं की, डिलिव्हरी करावं लागेल, अडचणी आहेत. मग तुषारला कसं सांगायचं याचं मला खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा मी एकटीच जाऊन आले.’

Maharashtra TimesNakul Ghanekar : पायात घुंगरू घातल्यावर लोक चिडवायचे, डावरा असल्यामुळे हिणवायचे, पण बाबांनी सोडली नाही साथ; ‘ठरलं तर मग’ फेम सचिननं सांगितला कठीण काळ
‘दुसऱ्या अबॉर्शनच्या वेळेला सुद्धा मी एकटीच घरात होते आणि मी एकटीच डॉक्टरकडे जाऊन आले होते. दुसऱ्यावेळी पण तुषार शूटिंगला होता. यात त्याची काहीच चूक नाहीये. कारण, खरंच त्याला येता यायचं नाही. तिसऱ्यावेळी अबॉर्शन झालं, तेव्हाही तुषार नव्हता. तुषार रडला होता. त्याला बाळाची खूप इच्छा होती. आपल्या बाबतीत असं का होतंय असंही वाटलं. खरंतर, त्यानंतर मग माझ्या मनात प्रेग्नन्सीची भीती बसली होती. जेव्हा तुषार रडला आणि त्यानेही वेळ दिला, तेव्हा मी ठरवलं मी पुन्हा बाळासाठी चान्स घेणार. मग थोडे महिने मी नीट कामाकडे लक्ष दिलं. ‘ असं स्वातीनं शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वाती देवल बोलत होती.

Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ

स्वाती देवल पुढे म्हणाली की, ”तारक मेहता’ मालिकेत भिडेच्या बायकोच्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आलेलं. मंदारनेच मला फोन केलेला. त्यावेळी माझी ‘कळत नकळत’ ही मालिका चांगली सुरू होती. पण, मी नकार देऊ शकले नाही. त्यामुळे ती एक भूमिका गेली.’

Maharashtra TimesMini Mathur : ‘माझ्या सासरचे लोक धार्मिक नव्हते’, मुस्लीम दिग्दर्शकासोबत लग्न, आंतरधर्मीय विवाहाबद्दल स्पष्टच बोलली लोकप्रिय अभिनेत्री
दरम्यान, स्वाती देवलच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘आम्ही सातपुते’, ‘लक्ष्मी निवास’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा