Suyash Tilak Isha Foundation : ईशा फाउंडेशनच्या सहकार्याने अभिनेता सुयश टिळक याने सद्गुरुंनी तयार केलेल्या ७ मिनिटांच्या मार्गदर्शित ध्यानासह ‘बियाँड द स्पॉटलाइट’ या एका भावपूर्ण संध्याकाळचे आयोजन केले

रविवार संध्याकाळची सुरुवात ‘साउंड्स ऑफ ईशा’च्या भावपूर्ण सादरीकरणाने झाली. यातील ध्यानपूर्ण संगीताने शांतता आणि आत्मचिंतनाचे वातावरण तयार झाले. त्यानंतर उपस्थितांना सद्गुरुंच्या ‘मिरॅकल ऑफ माइंड’ ॲपद्वारे पंधरा मिनिटांच्या ध्यान प्रक्रियेचा अनुभव देण्यात आला. यावेळी त्यांनी ॲपच्या सोप्या पण प्रभावी मार्गदर्शित सरावाचा अनुभव घेतला.
सुयश टिळक काय म्हणाला?
ईशा फाउंडेशनसोबतच्या आपल्या वैयक्तिक प्रवासाबद्दल बोलताना सुयश टिळक याने सांगितले की, सुरुवातीला असलेली उत्सुकता कालांतराने संस्थेशी एका दृढ नात्यात कशी बदलली. सुयश म्हणाला, “मी सद्गुरुंचे व्हिडिओ पाहायचो आणि त्यांची पुस्तके वाचायचो, पण मी काही आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस नव्हतो. मी खूप व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणारा आणि जगभर एकट्याने प्रवास करणारा (सोलो ट्रॅव्हलर) व्यक्ती आहे. मात्र अभिनयाच्या प्रवासात मी माझ्या मानसिक आरोग्याकडे आणि स्वतःकडे दुर्लक्ष करु लागलो होतो. ‘इनर इंजिनिअरिंग’ हा कार्यक्रम केल्यानंतर मला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, ज्यांचे ओझे मी बऱ्याच काळापासून वाहत होतो. तेव्हाच मला जाणीव झाली की या पद्धती प्रत्येकालाच मदत करु शकतात; म्हणूनच ‘बियॉन्ड द स्पॉटलाइट’ ही संकल्पना पुढे आली.”
Chaitanya Chandratre : रस्ते चांगले करणाऱ्यांना गांधीजी हवेत, खड्डे पुन्हा मुंबईकरांच्या कवेत! मुंबईतील खड्ड्यांवरुन मराठी अभिनेत्याचे तिरकस टोले
त्यानंतर झालेल्या संवादात उपस्थितांना त्यांच्या विविध भूमिकांच्या पलिकडे जाऊन स्वतःशी पुन्हा नाते जोडण्यास प्रोत्साहित करण्यात आले. सुयशने धावपळीच्या वेळापत्रकात आणि सार्वजनिक जीवनातील तणावाच्या काळातही काही क्षण थांबून शांतता अनुभवण्याचे महत्त्व, तसेच दैनंदिन जीवनात आंतरिक समतोल जपण्याचे मूल्य यांवर भाष्य केले.
अनेक कलाकारांची उपस्थिती
या कार्यक्रमाला मनोरंजन आणि सर्जनशील क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली; यामध्ये किशोरी गोडबोले, स्नेहलता वसईकर, श्याम आणि रेशमी पाठक, अपर्णा दीक्षित, दुर्वा साळुंखे, पूजा पाटील, समित आणि रेशा राऊत, पांडुरंग पखाले, चारुल देशपांडे, दीप्ती दांडेकर, मंजिरी पुपाला, बेलिना डो, अश्विन शिवशरण आणि निरंजन जावीर यांचा समावेश होता. या सर्वांनी मनन-चिंतनाच्या या संध्याकाळमध्ये सहभाग घेतला आणि मानसिक स्वास्थ्य व सजग जीवनशैलीला प्राधान्य देणारी अशी ठिकाणे निर्माण केल्याबद्दल प्रशंसा केली.
अभिनेत्री किशोरी गोडबोले यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवासाविषयी सांगितले, “मी गेली दोन वर्षे सद्गुरुंच्या मार्गदर्शनानुसार शांभवी महामुद्रा साधनेचा सराव नियामितपणे करते आणि त्यामुळे मला सदोदित आनंदी राहण्याचा महामंत्र सापडला आहे.”
हा एक वेगळा अनुभव असल्याचे सांगत आणि ध्यानामुळे आपल्याला शांतता मिळते हे मान्य करत, मराठी आणि हिंदी मालिकांमधील अभिनेत्री स्नेहलता वसईकर म्हणाल्या, “मी कोईम्बतूरला जाण्यास उत्सुक आहे आणि सद्गुरुंसोबतचा हा आध्यात्मिक प्रवास सुरु करण्यासाठी मी लवकरच तिथे जाणार आहे.”
Celebrity Corner : धर्मवीरमधले राज ठाकरे ते लक्ष्मी निवासचा विश्वा, गोव्याच्या अनुज प्रभू सोबत गप्पा
स्वतः ‘ईशा क्रिया’चा गेल्या काही वर्षांपासून सराव करणारे आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे प्रसिद्धीस आलेले श्याम पाठक म्हणाले, “हा एक अद्भुत अनुभव होता, जो मला वैयक्तिक तसेच व्यावसायिक पातळीवरही उपयुक्त ठरेल.”
पाहुण्यांमधील संवादांनी संध्याकाळची सांगता होत असताना, ‘बियॉन्ड द स्पॉटलाइट’मुळे संगीत, सजगता आणि अर्थपूर्ण संवाद यांचा सुरेख संगम घडवून आणणारे एक व्यासपीठ यशस्वीपणे निर्माण झाले.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे स्वतः याच्या गाडीवर चायनिज खातात; मराठी नाटकाला ताज्या घडामोडींचा संदर्भ, निखिल चव्हाणचा डायलॉग चर्चेत
‘मिरॅकल ऑफ माइंड’
‘मिरेकल ऑफ माइंड’ हे सद्गुरूंचे एक मोफत ध्यान (मेडिटेशन) ॲप आहे, जे मानसिक आरोग्यासाठी ७ मिनिटांचे एक साधे ‘गाइडेड मेडिटेशन’ उपलब्ध करुन देते. युजर त्यांच्या पसंतीनुसार या ध्यानाचा कालावधी २१ मिनिटांपर्यंत वाढवू शकतात. आधुनिक जीवनशैलीत सहजपणे सामावून घेता येईल अशा प्रकारे तयार केलेले हे ॲप, लोकांना दैनंदिन ध्यानधारणेद्वारे अधिक स्पष्टता, समतोल आणि आंतरिक स्वास्थ्य अनुभवण्यास मदत करते.

