Headlines

Supriya Sule: ‘राष्ट्रवादी’ला मनसेतच पाठवायचे बाकी राहिलेय! खासदार सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी – supriya sule denies rumors of ncp sharad pawar group merging with congress vows to stay allies


Supriya Sule: आमचा पक्ष पूर्णपणे एकसंध आहे. आमचा एकही खासदार पक्षाविरोधात बोललेला नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, सुळे यांनी शनिवारी (दि. ११) सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेतले.

supriya sule
सुप्रिया सुळे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: ‘आमचा आठ खासदारांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. रोज आम्हाला कुठल्या ना कुठल्या पक्षात पाठवले जाते. आता फक्त मनसेमध्ये पाठवायचे बाकी राहिले आहे, ’ अशी मिश्किल टिप्पणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘ऑपरेशन तुतारी’वर उपरोधिक भाष्य करत विरोधकावर निशाना साधला आहे.

राज्यात ‘ऑपरेशन टायगर-३’, ‘ऑपरेशन तुतारी’ आणि संभाव्य पक्षांतरांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असताना सुळे यांनी शनिवारी (दि. ११) पक्षांतराच्या वावड्यांवर उपरोधिक टीका केली. ‘आता ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार, असाही जोक आमच्या ग्रुपमध्ये फिरत आहे.’ असा टोमणाही त्यांनी विरोधकांना लगावला. त्याचवेळी ‘लोकप्रतिनिधींना कमोडिटी बनवण्याचा प्रकार लोकशाहीला शोभणारा नाही,’ असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी या अफवांमागील ‘सूत्रां’वरही टीका केली.

Maharashtra TimesShivsena UBT: ठाकरे गटाबाबत कल्लोळ! नगरसेवकफुटीचे पक्षाकडून खंडन; सर्व 15 नगरसेवक सोबतचा दावा
‘कर्जमाफीच्या घोषणा झाल्या; पण अंमलबजावणी झाली नाही. कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. भूसंपादनग्रस्तांना न्याय मिळायलाच हवा,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलात, त्याच पक्षात पाच वर्षे राहिले पाहिजे. पक्ष बदलायचाच असेल, तर आधी राजीनामा द्यावा आणि पुन्हा जनतेचा कौल घ्यावा. जनतेने दिलेल्या मतांचा विश्वासघात होता कामा नये,’ असे त्या म्हणाल्या.

Supriya Sule | पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, आत्याबाई म्हणाल्या, ‘आता पोरांनी मनावर घेतलंय’

‘लवकरच गोड बातमी’
पवार कुटुंबातील लग्नसराईचा उल्लेख करताना खा. सुळे यांनी ‘आमच्या घरी सध्या लग्नाचे वातावरण आहे. युगेंद्र, जय, रेवती यांच्यानंतर आता पार्थ पवारच्या लग्नाची तयारी सुरू आहे. आणखी एक गोड बातमी लवकरच तुम्हाला कळेल,’ असे सांगत त्यांनी उपस्थितांची उत्सुकता वाढवली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करीत या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मंदिरांतील चोरी दुर्दैवी
अयोध्येपासून उज्जैनपर्यंत मंदिरांमध्ये भ्रष्टाचार, चोरी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या घटना समोर येत आहेत. समाजाला मर्यादा आणि मूल्ये शिकविणाऱ्या मंदिरांनाच भ्रष्टाचाराचा विळखा पडणे दुर्दैवी आहे. या प्रकरणांवर सरकारने मौन बाळगू नये. दोषींवर कठोर कारवाई करून स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा