Headlines

Eknath khadse reaction on meeting with bjp vinod tawde and shivsena uddhav Thackeray; आधी विनोद तावडेंसोबत भेट, नंतर थेट ठाकरेंसोबत फोटो; खडसेंच्या मनात चाललंय काय? भेटीगाठींबाबत स्वत:च केला खुलासा


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अलीकडेच भाजपचे नेते विनोद तावडे आणि शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर लगेचच खडसे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले. मात्र, स्वतः खडसे यांनीच या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करून ही भेट केवळ निमंत्रणासाठी असल्याचे स्पष्ट केले. त्याच वेळी आमदारकी सोडून खडसे सध्या तरी भाजपमध्ये जाण्याची जोखीम पत्करण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे मत राजकीय निरीक्षक नोंदवत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये घरवापसी होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर खडसे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख; तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते. त्यामुळे खडसे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क रंगू लागले.

भेटीनंतर खडसे यांनी कारण स्पष्ट केले. पुढील महिन्यात खडसे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस समर्थकांकडून साजरा केला जाणार आहे. याच कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी कार्यकर्त्यांसह ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. ही केवळ औपचारिक भेट होती. या भेटीचा कोणत्याही राजकीय घडामोडी किंवा पक्षप्रवेश यांच्याशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गिरीश महाजांचा टोला

खडसेंबाबतच्या घडामोडींवर शनिवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर अत्यंत शेलक्या आणि खोचक शब्दात टीका केली आहे.

खडसे मोठे; त्यांची हॉटलाईन दिल्लीपर्यंत- गिरीश महाजन

मंत्री गिरीश महाजन यांनी नेहमीच्या शैलीत खडसेंना टोमणे मारले. महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत किंवा त्यांनी विनोद तावडे अथवा इतर कोणाची भेट घेतली, याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्यांचा भाजप प्रवेश थांबवणारा मी कोण? त्यांची थेट दिल्लीत ‘हॉटलाइन’ आहे. मी खूप छोटा माणूस आहे, माझी तर मुंबईपर्यंतही हॉटलाईन नाही. आपण जळगावमध्ये आपले बरे आहोत. खडसेंना जर वरिष्ठ पातळीवरून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला असेल, तर कोणाला अडचण असण्याचे काय कारण? खडसे फार मोठी माणसे आहेत. आगामी काळात त्यांचा वाढदिवस येत असून तो मोठाच होईल; त्यासाठी दिल्लीवरून माणसे येतील. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण आल्यावर तिथे जायचे की नाही, याचा विचार करू,” असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत