Headlines

दिवंगत नेते विकास सावंत यांच्या स्मृतींना उजाळा


सावंतवाडी: प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात ‘आदर्श शाळा’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलला एक वेगळे वलय मिळवून देण्यात माजी अध्यक्ष विकास सावंत यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे विचार आणि आचार हीच खरी शिदोरी असून, त्यांचा हा वारसा आम्ही अविरतपणे पुढे सुरू ठेवू, अशी ग्वाही सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय विकास सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयात विकास सावंत यांच्या आठवणींना उजाळा देणारा विशेष कार्यक्रम पार पडला.दोडामार्ग येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ आणि ‘नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान’ संचलित ‘शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, संस्थेचे सदस्य प्रा. सतीश बागवे, संदीप राणे, चंद्रकांत सावंत, वसुधा मुळीक, छाया सावंत, स्नेहा परब, डॉ. नितीन सावंत, सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर, काँग्रेस नेते राजू मसुरकर, संदीप भराडे, अभिजीत सावंत, सुरेश सावंत, संजय कानसे, मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा नाईक, प्रभारी उपप्राचार्या सविता माळगे, पर्यवेक्षक नामदेव मुठे, बाळासाहेब नंदीहळी, माजी मुख्याध्यापक दशरथ परब, श्री. पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. देवरकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत