Sunil Lahri On Gen Z : सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जेन झींबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – रामानंद सागर यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी अनेक सामाजिक तसेच राजकीय विषयांवर उघडपणे बोलतात. यावेळी त्यांनी जेन झींबद्दल भाष्य केलं आहे.
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
जेन झींबद्दल काय म्हणाले सुनील लहरी?
दिल्लीतील जेन झी ंच्या आंदोलनामुळे जेन झी, चर्चेचा विषय ठरलेत. सुनील लहरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी देशाच्या संस्कृतीबद्दलही भाष्य केलं आहे. सुनील लहरी म्हणाले, ‘जेन झी, जेन अल्फा, आपण आपल्या भावी पिढ्यांना संबोधण्यासाठी कोणत्या प्रकारचे शब्द वापरत आहोत? ही आपली संस्कृती नाही. या शब्दांमुळे आपण आपल्या भावी पिढ्यांना स्वतःपासून दूर करत आहोत. आपण असे शब्द बोलले पाहिजेत जे पिढ्यांना आपल्या जवळ आणतील. भारत ही जगातील सर्वात जुनी आणि समृद्ध संस्कृती आहे. याव्यतिरिक्त, आदर आणि प्रतिष्ठेची भावना रुजवण्यासाठी आपण आपल्या शाळांमध्ये गुरुकुल अभ्यासक्रमाचा समावेश केला पाहिजे.’
टीव्ही मालिका ‘रामायण’
सुनील लाहरी यांनी १९८७ मध्ये प्रसारित झालेल्या लोकप्रिय पौराणिक मालिका ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारली होती, तर अरुण गोविल यांनी प्रभू राम आणि दीपिका चिखलिया यांनी माता सीता यांची भूमिका साकारली होती.
Ajit Vachani : अभिनेत्यानं बॉलिवूड गाजवलं, शाहीर साबळेंच्या लेकीसोबत लग्न; वयाच्या 52व्या वर्षी निधन, मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री टीव्ही मालिकेच्या लोकप्रियतेनंतर, ‘रामायण’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू रामाची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सुनील लहरी यांनी रणबीरचे कौतुक केलं. डीएनएशी बोलताना रणबीरच्या लूकवर भाष्य करताना सुनील म्हणाले, ‘अरुण गोविल यांच्या चेहऱ्यावर दिसणारा संयम आणि निरागसता यात दिसत नाही. मात्र, मला आशा आहे की, रणबीर आपल्या अभिनयानं या भूमिकेला न्याय देईल.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा