Headlines

Sumeet Raghavan : ‘प्रश्न विचारले तर देशाचं नाव खराब होतं’, सुमीत राघवनचा संताप; म्हणाला, ‘लोकशाही आहे की नाही?’


Sumeet Raghavan Post : सुमीत राघवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

Sumeet Raghavan Supports CJP Protest And Slams Government
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सध्या देशभरात दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाची चर्चा सुरू आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी जखमी झाले. आता मुंबईतही आंदोलन सुरू झालं आहे. त्यावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता सुमीत राघवननंही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याप्रकरणी भाष्य केलं आहे.

सुमीत राघवनची पोस्ट

सुमीत राघवननं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत, प्रश्न विचारायचे नाहीत, प्रश्न विचारले तर देशाचं नाव खराब होतं, असं म्हटलं आहे. सुमीत म्हणाला की, ‘प्रश्न विचारू नका. जे चाललंय ते चांगलंच चाललंय. प्रश्न विचराले की देशाचं नाव खराब होतं. आमच्या राज्यात महाराष्ट्रात तर पाहिलं आम्ही की, प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान होतो. मग कोणा राजकीय नेत्याच्या गुंडांनी डॉक्टरांना बेदम मारलं तरी. जे फक्त ऐकलेलं नाहीये तर व्हिडिओमध्ये ते घडताना दिसतंयसुद्धा पण, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही. ब्रिज तुटत आहेत, २००५ मध्ये पूर आला होता. आज २०२६ मध्ये सुद्धा २१ वर्षांनंतर पूर येतो आणि वसई, विरार नालासोपारासारख्या ठिकाणी ३ दिवस लाईट नसते. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही.’
Maharashtra TimesRanjana Deshmukh : अपघातानं अपंगत्व आलं, तरीही नाही मानली हार; रंजना देशमुख यांनी व्हिलचेअरवर बसून नाटकात केलेलं काम
‘प्रश्न विचारले की हात उचला जातो. बघताय ना तुम्ही सोशल मीडियावर सगळीकडे तेच सुरू आहे. हे काय चाललंय हा, काय सुरू आहे. ही लोकशाही आहे की नाही? काय चूक आहे त्या मुलांची? हे चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं ना, जेव्हा तुम्हाला अंदाजा आला होता, तेव्हा संवाद का सादला गेला नाही. इतकं कठीण होतं का? किती मारलं आहे मुलांना. कोण आहेत ही मुलं? आपल्या देशाची आहेत ना! तुम्हीसुद्धा देशाचेच आहात ना! मग हे काय सुरू आहे? मला खरंच कळत नाहीये की, यावर काय बोलावं. पण हे इतकं चुकीचं कसं होऊ शकतं.’
‘आमच्या महाराष्ट्राचे एक नेते म्हणाले हे दहशतवादी आहेत. ही मुलं दहशतवादी आहेत का? ही मुलं आपलं भविष्य आहेत. कृपया तुमच्या खुर्चीवरुन उठा आणि संवाद साधा. त्यांच्या खांद्यावर हात ठेवा आणि त्यांना आत्मविश्वास द्या. घरातील मोठी माणसं त्यांच्या मुलांशी प्रेमानं संवाद साधतात. कृपया त्यांच्याशी संवाद साधा आणि राहिला प्रश्न या मुलांचा तर, त्यांना सलाम. काय ताकद आहे. मी खूप लहान कलाकार आहे आणि सामान्य नागरिक आहे पण मी तुमच्याबरोबर आहे.’ असं सुमीतनं शेवटी म्हटलंय.