प्रेक्षक म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहताना तुम्हाला काय जाणवलं ?
गेल्या वर्षी मी ‘मटा सन्मान’च्या नाटक विभागाचं परीक्षण केलं होतं. त्यामुळे महिनाभरात अनेक नाटकं पाहताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे मराठी रंगभूमीवरील विषयांचं वैविध्य. प्रेक्षकही त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. काही वर्षांपूर्वी नाट्यगृहांमध्ये कमी प्रेक्षक दिसत होते, ती परिस्थिती आता बदलताना दिसतेय. याचा अर्थ प्रेक्षकांना नाटक हवं आहे. नाटक हा जसा कलाकारांसाठी जिवंत अनुभव असतो, तसाच तो प्रेक्षकांसाठीही असतो. आज नेपथ्य, प्रकाशयोजना आणि तांत्रिक मांडणीमध्येही मोठे प्रयोग होत आहेत.आजची तरुण पिढी रंगभूमीकडे अधिक आकर्षित होताना दिसते. त्यांना त्यांच्या भावना, विचार आणि अनुभव व्यक्त करण्यासाठी नाटक हे प्रभावी माध्यम वाटतं. त्यामुळे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून अनेक तरुण मंडळी पुढे येत आहेत.
‘आता थांबवायचं कसं?’च्या तरुण कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?
आकाश आणि ऐश्वर्या या दोघांसोबत काम करणं हा माझ्यासाठीही एक वेगळा अनुभव होता. हे त्यांचं पहिलंव्यावसायिक नाटक आहे. त्यामुळे सुरुवातीला त्यांना रंगभूमीच्या काही वेगळ्या गोष्टी समजावून सांगाव्या लागल्या. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की, अभिनय करण्यापेक्षा त्या भावनेत स्वतःला झोकून द्या. तुम्हाला स्वतःला जेव्हा त्या प्रसंगाची वेदना किंवा आनंद जाणवेल, तेव्हाच तो अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. मात्र या दोघांकडून मलाही खूप काही शिकायला मिळालं. त्यांची चिकाटी, मेहनत आणि शिकण्याची तयारी विलक्षण होती. प्रयोगागणिक त्यांच्यात होत गेलेली प्रगती पाहणं हा आनंददायी अनुभव होता.
Aaraya Ghare : मी माझा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा केलेला, आर्या घारेने सांगितली बर्थेडेची आठवण
नाट्यगृहांच्या सुविधा आणि देखभालीबाबत तुमचं मत काय आहे ?
आज अनेक नाट्यगृहांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवतो. काही ठिकाणी नाट्यगृहांची स्वच्छता, देखभाल आणि कलाकारांसाठी आवश्यक असलेल्या सोयी व्यवस्थित नसतात. मात्र याबाबतीत केवळ प्रशासन किंवा व्यवस्थापनालाच दोष देऊन चालणार नाही. कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक आणि नाट्यगृह प्रशासन या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो, ती जागा आपल्याच घरासारखी जपली पाहिजे. काही कलाकार मेकअप रूममध्ये भिंती, आरसे किंवा पडदे अस्वच्छ करून ठेवतात. हे चित्र बदलायला हवं. पूर्वी नाट्यपरिषदेतर्फे नाट्यगृहांची नियमित पाहणी करणारी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. लॉकडाऊनमुळे तो पुढे जाऊ शकला नाही. पण अशी व्यवस्था व्हायला हवी. कौतुकाची बाब म्हणजे रवींद्र नाट्यगृह अत्यंत सुंदर आणि सुयोग्य सुविधांनी युक्त आहे. त्यासाठी संचालिका मीनल जोगळेकर यांचं विशेष कौतुक आहे.
गिरीश ओक – सुकन्या मोने पुन्हा एकत्र, आता थांबवायचं कसं? डोळ्यांत अंजन घालणारं नाटक
नाटकांचे वाढते खर्च, तिकीटदर आणि प्रेक्षकांची भूमिका याकडे तुम्ही कसं पाहता ?
मराठी प्रेक्षक हा केवळ मनोरंजनासाठी येत नाही, तर विषय समजून घेण्यासाठी, विचार ऐकण्यासाठी आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी येतो. त्यामुळे आज नाटक आणि प्रेक्षक यांच्यातील नातं अधिक मजबूत झालंय. मराठी रंगभूमी सध्या सकारात्मक आणि समृद्ध टप्प्यातून जातेय. आज निर्मात्यांसमोरही अनेक आर्थिक आव्हानं आहेत. नाटक उभं करणं, कलाकार आणि तंत्रज्ञांचा प्रवास, नेपथ्य, जाहिरात, नाट्यगृह भाडं अशा खर्चामध्ये वाढ झाली आहे. निर्माते केवळ नफा कमावण्याच्या उद्देशानं काम करत नसून; त्यांना चांगलं नाटक अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. अशा परिस्थितीत तिकीटदरांबाबतही वास्तववादी दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. महागाई सर्वसामान्यांना जाणवते, तशीच ती नाट्यनिर्मितीलाही जाणवते. अर्थात, प्रेक्षकांचं म्हणणंही योग्य आहे. तिकीटदर वाढत असतील, तर नाट्यगृहांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुविधा याही तितक्याच चांगल्या असायला हव्यात. निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ सगळेच चांगली नाटकं देण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. त्यामुळे प्रेक्षक, नाट्यगृह प्रशासन आणि सांस्कृतिक संस्था यांनीही त्याला तितकीच साथ दिली पाहिजे.
Isha keskar: ‘जय मल्हार’ मालिकेसाठी ईशा केसरकरला मिळायचं पर डे इतकंच मानधन, स्वत:च केला खुलासा
आज अनेक नाट्यगृहांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवतो. मात्र याबाबतीत केवळ प्रशासन किंवा व्यवस्थापनालाच दोष देऊन चालणार नाही. कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक आणि नाट्यगृह प्रशासन या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे.”
– सुकन्या मोने

