Headlines

Suhasini Mulay Pink Saree | वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करणाऱ्या सुहासिनी मुळेंचा पिंक साडीतील एलिगंट लुक; 60 नंतर स्टायलिश दिसण्यासाठी घ्या टिप्स


आज अनेक महिला 50 किंवा 60 नंतर फॅशनपासून दूर राहतात. मात्र सुहासिनी मुळे यांचा हा लुक सांगतो की, स्टाईल ही वयावर नाही तर व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. योग्य रंग, योग्य पेहराव आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम साधला तर कोणतीही महिला कोणत्याही वयात आकर्षक दिसू शकते.

Suhasini Mulay Pink Saree
Suhasini Mulay Pink Saree
वय हा फक्त एक आकडा असतो, हे आपल्या आयुष्याने आणि व्यक्तिमत्त्वाने सिद्ध करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सुहासिनी मुळे. अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्यांच्या अभिनयाइतक्याच त्यांच्या साधेपणाच्या आणि एलिगंट फॅशन सेन्सच्या देखील चर्चा रंगत असतात. विशेष म्हणजे त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी विवाह करून अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी वय महत्त्वाचे नसते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

अलीकडेच सुहासिनी मुळे यांचा गुलाबी रंगाच्या साडीतील एक सुंदर फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. साधा मेकअप, मोहक हास्य आणि पारंपरिक साडीतील त्यांचा ग्रेसफुल लुक पाहून चाहतेही भारावून गेले आहेत. जर तुम्हीही 60 नंतर स्टायलिश आणि एलिगंट दिसण्याचा विचार करत असाल, तर त्यांच्या या लुकमधून अनेक फॅशन टिप्स घेता येतील. (फोटो सौजन्य :- @mulay.14)

पिंक साडीने खुलून आला व्यक्तिमत्त्वाचा साज

पिंक साडीने खुलून आला व्यक्तिमत्त्वाचा साज

सुहासिनी मुळे यांनी परिधान केलेली पिंक रंगाची सिल्क साडी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलवणारी आहे. साडीच्या काठावर असलेली सोनेरी बॉर्डर संपूर्ण लुकला रॉयल टच देते. गडद किंवा अतिभडक रंगांऐवजी अशा सॉफ्ट आणि एलिगंट शेड्स कोणत्याही वयोगटातील महिलांना आकर्षक दिसू शकतात.गुलाबी रंग हा उत्साह, सकारात्मकता आणि सौंदर्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे 60 नंतरही हा रंग आत्मविश्वासाने परिधान करता येतो.
साधा ब्लाऊज, पण स्टायलिश लुक
या साडीसोबत त्यांनी गोल्डन रंगाचा हाफ स्लीव्हज ब्लाऊज परिधान केला आहे. ब्लाऊजवर कोणत्याही प्रकारचे जड डिझाइन किंवा भरतकाम नाही. साधेपणातही सौंदर्य कसे खुलवता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.जर तुम्हाला एलिगंट लुक हवा असेल तर साडीपेक्षा ब्लाऊजवर जास्त प्रयोग करण्यापेक्षा साधा आणि फिटिंगचा ब्लाऊज निवडणे अधिक योग्य ठरते.

कमीत कमी दागिन्यांमध्येही दिसू शकता आकर्षक

कमीत कमी दागिन्यांमध्येही दिसू शकता आकर्षक

आजकाल जड दागिने घालण्याचा ट्रेंड असला तरी सुहासिनी मुळे यांनी अगदी मोजके दागिने परिधान केले आहेत. गळ्यात एक नाजूक मंगळसूत्र, हातात घड्याळ आणि साधी अंगठी एवढ्याच अॅक्सेसरीज त्यांनी निवडल्या आहेत. यामुळे संपूर्ण लक्ष त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि साडीच्या सौंदर्यावर जाते. 60 नंतर अतिजड दागिने टाळून मिनिमल ज्वेलरीची निवड केल्यास लुक अधिक क्लासी दिसतो.

नैसर्गिक मेकअपने वाढवले सौंदर्य

नैसर्गिक मेकअपने वाढवले सौंदर्य

त्यांच्या या लुकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा नॅचरल मेकअप. हलका फाउंडेशन, सौम्य लिपस्टिक, कपाळावर लाल टिकली आणि कोणताही अतिभडक मेकअप नाही.वय वाढल्यानंतर त्वचेचा नैसर्गिक पोत टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे जड मेकअपऐवजी हलका आणि त्वचेला सूट होणारा मेकअप अधिक आकर्षक दिसतो.

साधी हेअरस्टाईल ठरली परफेक्ट

साधी हेअरस्टाईल ठरली परफेक्ट

सुहासिनी मुळे यांनी केस व्यवस्थित मागे बांधले आहेत. कोणतेही अवघड हेअरस्टाईल न करता त्यांनी क्लासिक बन निवडला आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा अधिक उठून दिसतो.60 नंतर केसांवर अतिप्रयोग करण्यापेक्षा नीटनेटकी हेअरस्टाईल संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच ग्रेस देते.

सुहासिनी मुळे साडी लुक

60 नंतर एलिगंट दिसण्यासाठी घ्या या टिप्स

60 नंतर एलिगंट दिसण्यासाठी घ्या या टिप्स
  • सॉफ्ट आणि एलिगंट रंगांच्या साड्यांची निवड करा.
  • सिल्क, कॉटन सिल्क किंवा लिनेनसारखे आरामदायी फॅब्रिक वापरा.
  • जड दागिन्यांऐवजी मिनिमल ज्वेलरी घाला.
  • त्वचेला अनुरूप हलका मेकअप करा.
  • नीटनेटकी हेअरस्टाईल ठेवा.
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा