Headlines

Stray Dogs: कुत्र्यांना शाळा, रुग्णालय भागात ‘नो एन्ट्री’; सर्वोच्च न्यायालय आदेशाचे सरकार करणार पालन – maharashtr govt to comply with supreme court order banning dogs in school and hospital areas


Supreme Court Verdict On Stray Dogs: रेबीजग्रस्त, असाध्य आजारी किंवा अत्यंत आक्रमक झालेल्या श्वानांना पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने दयामरण (यूथेनेशिया) देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

stray dog
stray dogs(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे राज्यातील शाळा, रुग्णालये, बसस्थानके, रेल्वेस्थानके, क्रीडा संकुले, तसेच इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी अशा कुत्र्यांचा वावर प्रतिबंधित करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी आढळणाऱ्या कुत्र्यांना तातडीने पकडून निवारागृहात हलविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नगरविकास विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी चौदा कलमी मार्गदर्शक सूचनादेखील लागू केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सुमोटो प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात, हल्ले आणि मृत्यूंची गंभीर दखल घेतली. त्यानंतर राज्य सरकारने न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शासननिर्णय जारी केला. आदेशांचे पालन करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा त्यांची अंमलबजावणी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात थेट न्यायालयाच्या अवमानाची कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे.

Maharashtra TimesSuhas Kande On Bhujbal: भुजबळांच्या खात्यात घोटाळा! आमदार सुहास कांदेंचा गंभीर आरोप, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
प्राणी जन्म नियंत्रण नियम २०२३ नुसार शाळा, रुग्णालये, विमानतळ, तसेच सुरक्षित व मर्यादित प्रवेश असलेल्या परिसरात निर्बीजीकरण आणि लसीकरण झाल्यानंतरही भटक्या कुत्र्यांना पुन्हा सोडता येणार नाही. प्रत्येक महापालिका आणि नगर परिषदेला भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. श्वानदंशाच्या घटनांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालयांमध्ये अँटी-रेबीज लस, तसेच रेबीज इम्युनोग्लोब्युलिनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हिंस्र श्वानांना दयामरणाची तरतूद
मोठ्या प्रमाणावर श्वान निर्बीजीकरण, रेबीज लसीकरण आणि जंतनिर्मूलन मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यमान निर्बीजीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे, नवीन केंद्रे उभारणे आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

Maharashtra TimesSupriya Sule: ‘राष्ट्रवादी’ला मनसेतच पाठवायचे बाकी राहिलेय! खासदार सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी
राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. श्वान निर्बीजीकरण केंद्रांचा विस्तार केला जात असून, भटक्या कुत्र्यांसाठी सहाही विभागांत निवारागृहांची उभारणी केली जाणार आहे. मिळकत विभागाकडे जागेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. – डॉ. प्रमोद सोनो पशुसंवर्धन अधिकारी, नाशिक मनपा

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा