Richest Temple: भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्याकडे सोने, रोकड, जमीन, गुंतवणूक आणि देणग्यांच्या स्वरूपात हजारो कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ही मंदिरे केवळ श्रद्धेचे केंद्रच नाही, तर देशातील सर्वात समृद्ध धार्मिक संस्थांपैकी आहेत.

भारतातील 10 मंदिरांकडे 9 लाख कोटींची संपत्ती
भारताला मंदिरांची भूमी म्हटलं जातं. आपला देश प्राचीन, भव्य आणि श्रीमंत मंदिरांनी गजबजलेला असून काही मंदिरे इतकी श्रीमंत आहेत की त्यांची संपत्ती अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. ग्लोबल वेल्थ इंडेक्स 206 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 10 मंदिरांची एकूण मालमत्ता 9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत मंदिर
तिरुपती बालाजी जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या लिस्टमध्ये जगातील तिसरे सर्वात श्रीमंत धर्मस्थळ आहे, ज्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता 3.38 लाख कोटींची तर, केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराला प्राचीन खजिन्याच्या बाबतीत अधिकृतपणे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. IMF आणि जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, श्री पद्मनाभस्वामी मंदिराची एकूण संपत्ती सायप्रस, आइसलँड आणि एस्टोनियासह 100 लहान देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या संरक्षणाखाली श्री पद्मनाभस्वामी मंदिर
श्री पद्मनाभस्वामी मंदिर सृष्टीचे रक्षक भगवान विष्णूंना समर्पित आहे. केरळमधील तिवनंतपुरम येथे स्थित या मंदिराखाली अनेक गुप्त तिजोऱ्या आहेत, ज्यांना नेत्रकला किंवा तिजोऱ्या म्हणूनही ओळखले जाते. 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापैकी काही तिजोऱ्या उघडल्या गेलेल्या आणि जेव्हा या प्राचीन मंदिराचे दरवाजे उघडले, तेव्हा संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले. त्यात कोणाच्याही कल्पनेपलीकडे इतका सोने-हिऱ्यांचा खजिना होता. सध्या केरळमधील हे मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या संरक्षणाखाली आहे.
केरळमधील सर्वात श्रीमंत मंदिरात किती खजिना
या मंदिरात नियमित आणि विशेष प्रसंगी सरासरी 1 ते 5 कोटींची देणगी मिळते, पण या मंदिरातील खजिन्याचा अचूक अंदाज लावणे अत्यंत कठीण आहे.उत्खनन केलेल्या तळघरांमध्ये सापडलेल्या खजिन्याचे अंदाजित मूल्य सुमारे 1.50 लाख कोटी ते 2.50 लाख कोटी रुपये आहे. मंदिरात A ते F असे क्रमांक असलेली एकूण सहा मुख्य तळघरे असूनही अद्याप सर्व तळघरे उघडलेली नाही.
कोणत्या भारतीय मंदिराची अंदाजित संपत्ती किती?
देशभरातील नेक मोठ्या आणि प्रसिद्ध मंदिरांच्या मालकीची अब्जोंची संपत्ती, मालमत्ता आणि भरीव वार्षिक उत्पन्न आहे. यामध्ये केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर अग्रस्थानी असून आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर देखील देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी आहे. तिरुपती बालाजीची एकूण मालमत्ता अंदाजे 3 लाख कोटी ते 3.38 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, पण या मंदिरात कोणताही प्राचीन खजिना नाही.
अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचे वार्षिक उत्पन्न
ऐतिहासिक आणि धार्मिक संपत्तीसाठी अमृतसरमधील सुवर्ण मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या एकूण मालमत्तेचा कोणताही निश्चित अंदाज उपलब्ध नसला तरी, त्यापैकी सोने आणि ऐतिहासिक खजिन्यामुळे अत्यंत श्रीमंत मंदिर बनले. या सुवर्ण मंदिराचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 1,260 कोटी रुपये असल्याचा अंदाज असून पुरी येथील जगन्नाथ मंदिराची एकूण संपत्ती अंदाजे 1.20 लाख कोटी रुपये आहे.
शिर्डी आणि अयोध्येतील राम मंदिरांची संपत्ती
शिर्डीतील साई बाबा मंदिर देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी असून एकूण अंदाजे 3000 कोटींची मालमत्ता असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तुलनेने नवीन असूनही अयोध्या येथील श्री राम मंदिर लक्षणीय संपत्ती आणि देणग्या असलेल्या मंदिरांपैकी म्हणून वेगाने उदयास आले आहे. राम मंदिरांची एकूण संपत्ती अंदाजे 6000 ते 9000 कोटी असल्याचा अंदाज असून सध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणानंतर, देणगी पेट्या आणि देणग्यांची चौकशी सुरू आहे.
वैष्णो देवी अन् सिद्धिविनायक मंदिरांची संपत्ती
तसेच जम्मू येथील वैष्णो देवी मंदिर देशातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी असून लक्षणीय संपत्ती असलेले ठिकाण असून अंदाजित एकूण सुमारे 2500 कोटींची मालमत्ता व्यवस्थानाकडे असल्याचा अंदाज आहे आणि वार्षिक अंदाजे 250 ते 300 कोटी रुपये उत्पन्न कमावते. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराची अंदाजित एकूण संपत्ती सुमारे 800 कोटी रुपये तर, वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराची अंदाजित एकूण संपत्ती सुमारे 3000 कोटी आहे.

