Headlines

Spider Man Brand New Day Gets Mixed Twitter review Fans Praise Emotion Criticize Pacing | स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे पाहण्याचा विचार करताय? तिकीट बुक करण्यापूर्वी हे ७ रिव्ह्यू वाचा, मगच निर्णय घ्या, अन्यथा पैसे जातील वाया


स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डेला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींना हा चित्रपट खूप आवडला, तर काहींनी त्यावर टीकाही केली. जर तुम्ही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आधी प्रेक्षकांनी दिलेले काही रिव्ह्यू वाचा; अन्यथा तुमची निराशा होऊ शकते.

Spider Man Brand New Day
(फोटो सौजन्य – @sri50/x.com)
स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे हा सुपरहिरोपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुपरहिरो फॅन्सकडून या चित्रपटाला मिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काहींना या चित्रपटातील ॲक्शन सीन्स आणि व्हीएफएक्स खूप आवडले आहेत. तर काहींनी चित्रपटातील खलनायक आणखी प्रभावी दाखवता आला असता, अशी टीका केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे, हा हॉलिवूड चित्रपट असतानाही तो सर्वप्रथम भारतात प्रदर्शित झाला आहे. जर तुम्ही स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे पाहण्याचा विचार करत असाल, तर जरा दोन मिनिटं थांबा, प्रेक्षकांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया वाचा आणि मग पुढचा निर्णय घ्या. चला पाहूया, प्रेक्षकांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया.

स्पायडरमॅनचा भावनिक संघर्ष

हा चित्रपट यापूर्वीच्या सर्व स्पायडरमॅन चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यावेळी पीटर पार्करच्या एकटेपणावर आणि त्याच्या भावनिक संघर्षावर अधिक भर देण्यात आला आहे. त्याचवेळी जबरदस्त ॲक्शन आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

सुपरहिरोपेक्षा भावनिक संघर्षावर अधिक भर

या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तो वास्तवाशी जोडलेला वाटतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिग्दर्शकानं एखादा भव्य किंवा अचंबित करणारा सुपरहिरोपट बनवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याऐवजी पीटर पार्करच्या वैयक्तिक संघर्षांवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे एखादा पारंपरिक सुपरहिरोपट पाहण्याचा विचार करत असाल, तर तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो.

भावनिक पण ॲक्शनचा थरार

ॲक्शनपेक्षा भावना अधिक भिडतात

चित्रपटातील ॲक्शन सीन्स आणि स्पायडरमॅनची वेब-स्विंगिंग दृश्यं खूपच सुंदर आहेत. पण एकटेपणाची भावना काय असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

हृदयाला भिडणारा स्पायडरमॅन

एकटेपणाची गोष्ट सांगणारा स्पायडरमॅन

स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे हा आजवरच्या सर्वोत्तम स्पायडरमॅन चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटात उत्कृष्ट ग्राफिक्स आणि दमदार ॲक्शन सीन्स आहेत. मात्र, हा चित्रपट ॲक्शनपेक्षा स्पायडरमॅनच्या आयुष्यातील एकाकीपणावर अधिक लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे जर कोणी फक्त टिपिकल सुपरहिरो चित्रपट पाहण्याच्या अपेक्षेने जात असेल, तर त्यांचा अपेक्षाभंग होऊ शकतो.

काही ठिकाणी चित्रपटानं निराश केलं

हा चित्रपट संमिश्र अनुभव देणारा आहे. सुरुवातीची २० मिनिटं कॉमिक्समधील स्पायडरमॅनची आठवण करून देतात आणि पीटर पार्करची व्यक्तिरेखा प्रभावीपणे उभी करतात. या चित्रपटात आवडण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण काही बाबतीत तो निराशही करतो.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा