Headlines

South Korea Most Expensive Divorce; आयुष्यभर कमावलं, घटस्फोटात गमावलं! दक्षिण कोरियात अब्जाधीशाचा घटस्फोट, पत्नीला देणार 944 अब्ज वोनची पोटगी


Who is SK Group Owner: एसके ग्रुपचे मालक 6,221 कोटी रुपयांची किंमत मोजून आपल्या पूर्व पत्नीपासून विभक्त होतील. नऊ वर्षांच्या खटल्यानंतर न्यायालयाच्या निकालाने सर्वत्र खळबळ उडवून दिली आणि जगातील सर्वात महागड्या घडस्फोटांपैकी ठरला.

chey tae won divorce settlement
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Divorce of the Century: जगातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा घटस्फोट चांगलाच गाजलेला. बेझोस यांना पहिली पत्नी मॅकेन्झी स्कॉटला घटस्फोटासाठी सेटलमेंट रक्कम म्हणून 38 अब्ज डॉलर्स देणे भाग पडलेले. त्यानंतर 2021 मध्येबिल गेट्स यांनी माजी पत्नी मेलिंडा गेट्स यांना $76 अब्जची पोटगी रक्कम दिलेली. पण आता आणखी एक घटस्फोट चर्चेत आला आहे, ज्यामध्ये टेक सेक्टरमधील दिग्गज उद्योगपतीला आता माजी पत्नीला $644 दशलक्ष देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

एसके ग्रुपचे मालक कोण?

दक्षिण कोरियाई कंपनी SK ग्रुपचे अध्यक्ष आणि अब्जाधीश चेय व त्यांच्या एक्स-पत्नीत घटस्फोटाचा खटला प्रलंबित होता. सर्वोच्च न्यायालयाने सोल उच्च न्यायालयाला अब्जाधीश उद्योगपती चेय आणि दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष रो ताए-वू यांची मुलगी रो सो-योंग यांच्यातील घटस्फोट खटल्याची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच कोर्टाने सेटलमेंटची अख्खी रक्कम कॅशमध्ये देण्याचे आदेश दिले असून यानंतरच कंपनीचे शेअर्स अध्यक्षांना परत मिळतील.

Maharashtra TimesTATA चा झटका! सणासुदीत महिन्याचे बजेट कोलमडणार; चहापासून मिठापर्यंत रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या किमती वाढणार

दक्षिण कोरियातील सर्वात महागडा घटस्फोट

कोर्टाने आयटी कंपनीचे मालक चेय आणि त्यांच्या माजी पत्नीमधील घटस्फोटाचा वाद मिटवण्यासाठी मालमत्तेच्या विभागणीचा आदेश दिला. कंपनीच्या वाढीत दोघांचा समान वाटा होता, असा कोर्टाने निकाल दिला असताना चेय कंपनीचे व्यवस्थापन पाहत होते, तर त्यांची पत्नी घरकाम सांभाळत होत्या असेही न्यायालयाने नमूद केले.1988 मध्ये चेय आणि रोह लग्नबंधनात अडकले व त्यांना तीन मुले आहेत. लग्नाच्या कित्येक वर्षांनंतर विवाहबाह्य संबंधांवरून वाद झाल्यानंतर चेय यांच्या पत्नीने 2017 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

Maharashtra TimesGold Silver Rate Today: पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीचा परिणाम; सोने-चांदीची स्वस्ताई ओसरली, अमेरिका-इराण युद्ध थांबताच दर पुन्हा वाढले
एसके ग्रुपचा व्यवसाय काय

दक्षिण कोरियातील दुसरी सर्वात मोठी कौटुंबिक मालकीची कंपनी, SK Group, सेमीकंडक्टर, दूरसंचार, ऊर्जा आणि जीवन विज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. 200 हून जास्त उपकंपन्यांसह कंपनीचा जागतिक महसूल 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असून अलीकडेच कंपनीने सॅमसंगला मागे टाकून 1.35 ट्रिलियन डॉलर्सचे मूल्यांकन गाठले.