Headlines

Sonam Wangchuk Explaination On Aamir Khan Statement Regarding 3 Idiots Movie ; त्याला शॉर्ट टाइम मेमरी लॉस झालाय! सोनम वांगचुक यांनी उडवली आमिर खानची खिल्ली, 3 इडियट्स सिनेमाबाबत पोलखोल


Sonam Wangchuk Explaination On Aamir Khan Statement : अभिनेता आमिर खानने सीजेपी विद्यार्थी आंदलनादरम्यान सोनम वांगचुक आणि 3 इडियट्स सिनेमाचा काहीही संबध नसल्याचे म्हटलेले, आता सोनम वांगचुक यांनी त्याची पोलखोल केली आहे.

aamir khan sonam wangchuk
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नीट पेपरफुटीनंतर अभिजीत दीपकेने केलेल्या विद्यार्थी आंदोलनाला समाजसेवक सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी उपोषणही केले होते. यावेळी त्यांना अनेक कलाकरांनी पाठिंबा दिला. तर काहींनी त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी मनधरणी सुद्धा केली. यावेळी अभिनेता आमिर खानही चर्चेत आला होता. त्याचा सुपरहिट सिनेमा थ्री इडियट्स हा सोनम वांगचुकवर आधारित असल्याचे बोलले जात होते. पण आमिरने ती गोष्ट अमान्य केली.

जेव्हा सोनम वांगचुक जंतर-मंतरवर उपोषणाला बसले होते, तेव्हा आमिर खानने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच, ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट बनवताना आपल्याला वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि ‘रँचो’ हे पात्र त्यांच्यापासून प्रेरित नव्हते, असा दावाही केला होता. आता सोनम वांगचुक यांनी आमिरच्या या दाव्यावर केवळ टीकाच केली नाही, तर त्यांची खिल्लीही उडवली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, ‘गजनी’ चित्रपटातील पात्राप्रमाणेच आमिरलाही ‘शॉर्ट-टर्म मेमरी लॉस’चा त्रास होत असावा.

Maharashtra TimesSunil Pal On Samay Raina : घोर कलियुग!आधी अपशब्द वापरा मग सन्मानही मिळवा; महाराष्ट्र सरकराकडून समय रैनाचा सत्कार होताच सुनील पालचा संताप
सोनम वांगचुक यांनी एका पॉडकास्टवर या विषयावर चर्चा केली आणि आमिर खानबाबतचे सत्य समोर आणले. त्यांनी आमिरसोबतच्या एका जुन्या भेटीची आठवण सांगितली आणि नमूद केले की, ती एक सविस्तर चर्चा होती ज्यामध्ये काही कल्पनांवरही विचारविनिमय झाला होता.

सोनम वांगचुक यांनी आमिर खान यांची गमतीशीर शब्दांत खिल्ली उडवली. प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टवर बोलताना वांगचुक म्हणाले, “असे अनेक व्हिडिओ होते ज्यात ते ‘गजनी’ चित्रपटातील वेशभूषेत माझे भाषण पाहताना दिसत होते; कदाचित त्या वेशभूषेमुळेच त्यांना शॉर्ट टाइम मेमरी लॉस झाला असावा. अवघ्या 15 मिनिटांनंतर तो सर्व काही विसरला असेल, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. अन्यथा, आमची भेट झाली होती आणि आम्ही सविस्तर चर्चाही केली होती. ते आपल्या भूमिकांमध्ये पूर्णपणे समरस होतात असे आपण ऐकले आहे; कदाचित ते ‘गजनी’च्या भूमिकेत इतके मग्न झाले असावेत की, ज्या पुरस्कार सोहळ्यात मी पुरस्कार स्वीकारत होतो, तो सोहळाच ते विसरले असावेत.”

Maharashtra TimesNikki Tamboli Arbaz Patel Breakup : निक्की तांबोळीकडून अरबाज पटेलची नात्यात फसवणूक? पोस्टमधून सांगितलं चिटिंगचं कारण, कपलने सोशल मीडियावरही एकमेकांना केलं अनफॉलो

आमिरसोबत सविस्तर चर्चा

सोनम वांगचुक यांनी पुढे नमूद केले की, त्यांनी आमिर खानसोबत अनेकदा सविस्तर चर्चा केली आणि त्यादरम्यान आपल्या कल्पना मांडल्या. त्यांनी हे स्पष्ट केले की, ‘3 इडियट्स’ हा चित्रपट आपल्या आयुष्यावर आधारित आहे किंवा ते आपले चरित्र आहे, असे ते म्हणणार नाहीत; त्याऐवजी, तो चित्रपट आपल्याकडून मिळालेल्या प्रेरणेचे प्रतिबिंब असल्याचे मानले जाऊ शकते.

वांगचुक यांचा दावा

वांगचुक यांनी दावा केला की, आमिरने त्यांच्या संभाषणातून काही मुद्दे कदाचित नकळतपणे आत्मसात केले असावेत आणि त्यातून सुचलेल्या कल्पना आपल्या टीमसोबत शेअर करून मूळ पटकथेत बदल केले असावेत. वांगचुक यांच्या मते, त्या कल्पनांचा मूळ स्रोत काय होता, याबद्दल आमीर खानने कदाचित आपल्या टीमला माहिती दिली नसावी.

सोनम वांगचुक यांच्याबद्दल आमुर खान काय म्हणाला?

‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट’मधील एका चर्चेदरम्यान जेव्हा आमिर खानला सोनम वांगचुक यांच्याबद्दल विचारण्यात आले—आणि विशेषतः ‘3 इडियट्स’ मधील ‘रँचो’ या पात्रासाठी त्याने वांगचुक यांच्याकडून प्रेरणा घेतली होती का, असे विचारले असता. तेव्हा तो म्हणाला, “नाही, खरं तर ते सत्य नाही. हा एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा चित्रपट बनवत होतो, तेव्हा मला मिस्टर. सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हती. मला माहित आहे की मी अलीकडेच एक व्हिडिओ पाहिला ज्यात ‘चतुर’ (अभिनेता ओमी वैद्य) असे म्हणताना दिसला. त्याचा गैरसमज झाला आहे. ‘चतुर’ला कदाचित तसे वाटत असेल, पण मला हे स्पष्ट करायचे आहे की राजू, अभिजात किंवा मला कोणालाच सोनम यांच्याबद्दल माहिती नव्हती. तरीही, मिस्टर सोनम जे काम करत आहेत ते उत्तम आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल आदर बाळगण्यासाठी ‘3 इडियट्स’मधील पात्र त्यांच्यावरच आधारित असणे आवश्यक नाही.”

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा