soman rana wins gold shubham juyal silver in mens shot put f57 ; याला म्हणतात जिद्द! देशसेवेत पाय गमावला, जवान सोमन राणा ‘गोल्ड’न बॉय ठरला, शुभमनेही सिल्व्हर जिंकलं
soman rana wins gold shubham juyal silver in mens shot put f57 ; याला म्हणतात जिद्द! देशसेवेत पाय गमावला, जवान सोमन राणा ‘गोल्ड’न बॉय ठरला, शुभमनेही सिल्व्हर जिंकलं
CWG 2026 Shot Put Gold Silver : राष्ट्रकुल स्पर्धेत शॉट पुट F57 प्रकारात भारताची ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली आहे. सोमन राणाने सुवर्ण तर शुभम जुयालने रौप्य पदक जिंकून पहिले दोन्ही क्रमांक पटकावले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ( Commonwealth Games 2026 ) शनिवारचा दिवस भारतासाठी अत्यंत खास ठरला. पुरुषांच्या शॉट पुट F57 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. भारताच्या सोमन राणाने सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले, तर शुभम जुयालने रौप्यपदकावर (Silver Medal) आपले नाव कोरले. कॅमेरूनच्या सेड्रिक इड्रिस लेकेजो आजमदजीने १२.५७ मीटर थ्रो फेकत कांस्यपदक जिंकले.
भारताची ऐतिहासिक कामगिरी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉट पुट F57 स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक आहे. ही कामगिरी खूप मोठी आहे, कारण या खेळात भारताने पहिल्यांदाच एकाच वेळी दोन-दोन पदके जिंकली आहेत. ग्लासगो २०२६ मधील अॅथलेटिक्समध्ये सोमन राणाचे हे भारतासाठी तिसरे सुवर्णपदक ठरले, तर शुभम जुयाल सातवा रौप्यपदक विजेता बनला. या दोन पदकांसह भारताच्या एकूण पदकांची संख्या आता ३० वर पोहोचली आहे.
या १० खेळाडूंच्या फायनल सामन्यात सर्वांना एकापाठोपाठ एक सलग सहा संधी मिळाल्या. भारतीय खेळाडू सर्वात शेवटी मैदानात उतरले. शुभम जुयालने आपल्या पहिल्याच १३.०८ मीटर थ्रोसह आघाडी घेतली. त्याने आपल्या शेवटच्या प्रयत्नात १३.२८ मीटरचा सर्वोत्कृष्ट थ्रो फेकला. पण त्यानंतर आलेल्या सोमन राणाने दुसऱ्याच प्रयत्नात १३.४० मीटर थ्रो फेकत शुभमला मागे टाकले आणि सुवर्णपदकावर कब्जा केला.
लँडमाइन ब्लास्टमध्ये गमावला होता पाय; जिद्दीच्या जोरावर जिंकले पदक
दरम्यान, सोमन राणाची ही कामगिरी त्याच्या कधीही हार न मानण्याच्या जिद्दीची कहाणी आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला ५ वर्षे राष्ट्रीय स्तरावर बॉक्सर राहिलेला सोमन २/८ गोरखा रायफल्समध्ये शिपाई होता. २००६ मध्ये पुंछ भागात झालेल्या सुरंग (लँडमाइन)स्फोटात त्याने आपला उजवा पाय गमावला होता. त्यानंतर २०१७ मध्ये जेव्हा तो कृत्रिम पाय बसवण्यासाठी गेला, तेव्हापासून त्याने पॅरा अॅथलेटिक्सला सुरुवात केली. आज त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत देशाचे नाव संपूर्ण जगात मोठे केले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा