Solapur Sandip Kumar Died after Being Beaten up due to Petty Dispute; पोटाची खळगी भरायला महाराष्ट्रात आला, पण नियतीनं घात केला, मारहाणीत संदीपचा करुण अंत; बायको-दोन लेकरं पोरकी
Solapur Sandip Kumar Died after Being Beaten up due to Petty Dispute; पोटाची खळगी भरायला महाराष्ट्रात आला, पण नियतीनं घात केला, मारहाणीत संदीपचा करुण अंत; बायको-दोन लेकरं पोरकी
Solapur Sandip Kumar Death Case : संदिपच्या डोळ्यात गरिबीवर मात करण्याची स्वप्नं होती आणि हातात रक्ताचं पाणी करून राबण्याची तयारी. पण नियतीच्या मनात काही औरच होतं.
सोलापूर संदीप कुमार मारहाण प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर : उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या एका छोट्याशा गावातून संदीपने आपल्या दोन लहान लेकरांना जवळ घेतलं आणि पत्नीच्या हातात थोडेसे पैसे ठेवले. ‘काळजी करू नकोस, महाराष्ट्रात रस्त्याचं काम आहे. दोन पैसे जास्त मिळतील, मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघेल. मी लवकरत परत येईल’, असं सांगून 30 वर्षांचा संदीप कुमार सोलापूरच्या जेऊर (ता. अक्कलकोट) गावाच्या दिशेने निघाला होता. त्याच्या डोळ्यात गरिबीवर मात करण्याची स्वप्नं होती आणि हातात रक्ताचं पाणी करून राबण्याची तयारी. पण नियतीच्या मनात काही औरच होतं.
नेमकी घटना काय?
1 ऑगस्ट 2026ला दुपारी संदीप कडक उन्हात रस्त्याचं काम करत होता. अचानक 12 वाजेच्या सुमारास सागर आणि दयानंद नावाच्या कामगारांसोबत त्याची काही कारणावरून भांडण झाली. पण निष्पाप मजुराच्या अगतिकतेचा फायदा घेत त्या दोघांनी संदीपवर अमानुष हल्ला चढवला. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुराला रक्तभंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. संदीप जीव वाचवण्यासाठी विनवण्या करत होता, पण त्या नराधमांचे हात थांबले नाहीत. तो जमिनीवर कोसळला, डोळ्यांसमोर अंधारी आली.
स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संदीपला तातडीनं अक्कलकोटच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. पण जखमा इतक्या गंभीर होत्या की डॉक्टरांनी त्याला सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संदीप सात दिवस मृत्यूशी झुंज देत होता. प्रत्येक श्वासागणिक त्याला आपल्या पत्नीचा आणि दोन चिमुकल्यांचा चेहरा आठवत होता. ‘आपण नाही राहिलो तर त्यांच्या पोटाचं काय होईल’, हा विचार त्याच्या मनात सतत येत होता. पण 8 ऑगस्ट 2026 रोजी त्याच्या शरीरानं साथ सोडली. परराज्यातून पोट भरण्यासाठी आलेल्या संदीपची प्राणज्योत अखेर मालवली.
अक्कलकोट पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत. पण या कायद्याच्या प्रक्रियेत एका निष्पाप कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. प्रयागराजमध्ये वाट पाहणाऱ्या त्या माऊलीला काय सांगावं? हा प्रश्न आता सर्वांना पडलाय. संदीपच्या भावाचा अश्रूंचा बांध फुटला होता. ‘आम्ही गरिबीला कंटाळून कामासाठी आलो होतो, मार खाऊन मरायला नाही’. दोन मुलांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपलं आहे. संदीपने रस्त्याचं काम तर केलं, पण त्याच्या स्वतःच्या कुटुंबाचा पुढचा रस्ता मात्र अंधारात ढकलला गेला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा