Headlines

Smart Meter Project Citizens Oppose Mahavitaran Many Demands from Customers; महावितरणने जनजागृती करण्याची मागणी; नागरिकांचा अजूनही स्मार्ट मीटरला विरोध, नेमक्या त्यांच्या मागण्या काय?


Smart Meter Project : ऊर्जा मंच हे स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात नाही. मात्र, नागरिकांच्या मनातील शंका वाढलेल्या आहेत. काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल वाढल्याच्या तक्रारीही समोर आलेल्या आहेत. यामुळे अशा तक्रारी कमी करण्यासाठी तसेच जनतेमध्ये स्मार्ट मीटरबाबत विश्वास वाढावा. यासाठी स्मार्ट मीटर आणि जुन्या वीज मीटर एकत्रित ठेवून प्रात्याक्षिक जनतेला दाखविण्यात यावे. तसेच आधी शासकीयकार्यालय, शासकीय निवास तसेच ज्या भागांमध्ये वीजचोरी जास्त अशा भागांमध्ये स्मार्ट मीटर बसवावे. अशी मागणीही ऊर्जा मंचच्या वतीने करण्यात आली.

Smart Meter Project
स्मार्ट मीटरचे फायदे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य वीज ग्राहकाने स्मार्ट मीटर बसवावे किंवा नाही. हा त्याचा ऐच्छिक विषय आहे. विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावा किंवा नाही हा ग्राहकांच्या इच्छेचा आहे. ‘महावितरण’तर्फे ग्राहकांना पाठविलेल्या मेसेजमध्ये केंद्रीय वीज नियामक आयोगाच्या निर्णयाची माहिती दिली जात आहे. हा आदेश नव्हे हे दिशानिर्देश आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने स्मार्ट मीटरबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती महावितरणने करू नये. स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करावी. लोकांच्या शंका दूर करून स्मार्ट मीटर त्यांच्या परवानगीने बसविण्यात यावे, अशी माहिती ऊर्जा मंचाचे हेमंत कपाडिया यांनी दिली.

४८ तासांत स्मार्ट मीटर लावण्याबाबत एसएमएस

ऊर्जा मंचाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषेदत हेमंत कपाडिया यांच्यासह प्रसाद कोकीळ, विनोद नांदापूरकर, ओमप्रकाश राठी, दिनेश पवार आणि शरद चौबे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी हेमंत कपाडिया यांनी सांगितले, ‘राज्यभरात वीज ग्राहकांच्या मोबाइलवर ४८ तासांत स्मार्ट मीटर लावण्याबाबत एसएमएस आणि व्हॉट्स मेसेज पाठविण्यात येत आहे. स्मार्ट मीटरबाबत समाजात अनेक समज-गैरसमज पसरलेले आहेत. असे असतानाही स्मार्ट मीटर लावण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
Maharashtra TimesKinjal Shah : विलेपार्ले स्टेशनजवळ इलेक्ट्रिक कारची धडक, भाजी खरेदीला आलेल्या विवाहितेचा अंत, 11 वर्षांचा लेक मायेला मुकला
स्मार्ट मीटर लावण्याबाबत ऊर्जा मंचाला आक्षेप नाही. मीटर बसविताना ग्राहकांना माहिती देणे, शेवटचे रीडिंग काय आहे, याचीही माहिती दिली जात नाही. ग्राहकांना माहिती नसताना हे स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. मग हा उद्योग कशाला? यामुळे स्मार्ट मीटरबाबत लोकांमध्ये असलेल्या संशयाला अधिक बळ मिळत आहे, असेही मत ऊर्जा मंचाच्या सदस्यांनी उपस्थित केला. प्रसाद कोकीळ, विनोद नांदापूरकर यांनी स्मार्ट मीटरबाबत नियमांची अंमलबजावणी होत नाही. उलट कायदेशीर कारवाईचा धाक आणला जात आहे, असे सांगितले.

आधी जनजागृती करा

ऊर्जा मंच हे स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात नाही. मात्र, नागरिकांच्या मनातील शंका वाढलेल्या आहेत. काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल वाढल्याच्या तक्रारीही समोर आलेल्या आहेत. यामुळे अशा तक्रारी कमी करण्यासाठी तसेच जनतेमध्ये स्मार्ट मीटरबाबत विश्वास वाढावा. यासाठी स्मार्ट मीटर आणि जुन्या वीज मीटर एकत्रित ठेवून प्रात्याक्षिक जनतेला दाखविण्यात यावे. तसेच आधी शासकीयकार्यालय, शासकीय निवास तसेच ज्या भागांमध्ये वीजचोरी जास्त अशा भागांमध्ये स्मार्ट मीटर बसवावे. अशी मागणीही ऊर्जा मंचच्या वतीने करण्यात आली.
Maharashtra TimesNashik Sangamner Pune Railway Project : नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वे प्रकल्पाला रेड सिग्नल, प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात; कारण काय?

पैसेही जनतेचेच

स्मार्ट मीटर बसविण्याचे मराठवाड्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याचा खर्च ग्राहकांकडून घेणार नसल्याचा दावा केला जात आहे. राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी तेहतीसशे कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हा खर्च जनतेचाच आहे. स्मार्ट मीटरच्या नावाखाली जुने मीटर काढून भंगार करणे हा राष्ट्रीय संपत्ती तसेच जनतेच्या खर्चाचा अपव्यय नाही का? असा सवालही ऊर्जा मंचने उपस्थित केला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा