SK Hynix Listing: जागतिक बाजारात वाढत्या AI च्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच ग्लोबल बाजारात नावलौकाला आलेली दक्षिण कोरियाची चिप कंपनी – एसके हायनिक्स – सुमारे 28 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन लिस्टिंगची तयारी करत आहे. ही लिस्टिंग यशस्वी झाल्यास जागतिक बाजारात कंपनीचे स्थान आणखी मजबूत होईल. भारतीय गुंतवणूकदार देखील अमेरिकन बाजारामार्फत ADR मध्ये गुंतवणूक करू शकतात.

सोमवारी, 6 जुलै रोजी, ही कंपनी अंदाजे 28 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासह सूचीबद्ध होणार असून AI तंत्रज्ञानाच्या वेगाने वाढणाऱ्या वापरामुळे कंपनीला गुंतवणूकदारांकडून जोरदार पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.
Maya Tata: माया टाटा आहेत तरी कोण? नोएल टाटांची मुलगी महासाम्राज्यात मोठी जबाबदारी पेलणार, TATA ग्रुपमध्ये त्यांची चर्चा का?
कोरियन कंपनीचे अमेरिकी शेअर बाजारात पदार्पण
एसके हायनिक्स अमेरिकी बाजारात ADR द्वारे नॅसडॅकवर लिस्ट होणार असून या दरम्यान, कंपनी अंदाजे 17.79 दशलक्ष नवीन शेअर्स जारी करेल. कंपनीच्या नियोजनानुसार एका शेअरच्या बदल्यात 10 ADR जारी केले जातील आणि शेअर्सची अंतिम किंमत या आठवड्यात ठरवली जाईल व लिस्टिंगनंतर ट्रेडिंग सुरू होईल.
जागतिक शेअर बाजारात AI क्षेत्रातील तेजीमुळे यावर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली होती, ज्याने गुंतवणूकदारांनाही चकित केले. तसेच येत्या काही वर्षांत एआय-संबंधित कंपन्यांची मागणी आणखी वाढेल, असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे अलीकडच्या या स्टॉक लिस्टिंगकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष लागून असेल.
Gold Price Today: तेजीनंतर सोन्याला उतरती कळा, चांदीच्या दरातही किंचित घसरण; आजचा दर पाहूनच खरेदीचा विचार करा!
कंपनीचा व्यवसाय काय
हाय-बँडविड्थ मेमरी म्हणजे HBM चिप्सचे उत्पादन करणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी एसके हायनिक्स एक असून या चिप्स AI मॉडेल्स आणि मोठ्या डेटा सेंटर्सना अधिक वेगाने काम करण्यास मदत करतात. त्यामुळे जगातील अनेक मोठ्या टेक कंपन्या या चिप्सचा वापर करतात.
एआयच्या वाढत्या मागणीमुळे गेल्या काही दिवसात एसके हायनिक्सला चिप बाजारात मोठी मागणी मिळाली. तसेच कंपनीने अलीकडेच नवीन चिप कारखाने सुरू करणे आणि उत्पादन वाढवण्यासाठी भविष्यात 100 ट्रिलियन वॉन, सुमारे 64 अब्ज डॉलर्स, गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली, ज्यामध्ये नवीन मेमरी चिप्स आणि नँड फ्लॅश स्टोरेजशी संबंधित प्रकल्पांचाही समावेश असणार आहे.
Property Rights: नातेवाईक, भाऊ-बहीण जमीन वाटपास तयार नाही; खरच संमतीशिवाय जमिनीतला हिस्सा तुम्हाला मिळतो का?
भारतीय कसे गुंतवणूक करू शकतात?
- सर्वप्रथम झिरोधा, ग्रोव, अपस्टॉक्स आणि एंजल वन यांसारख्या ब्रोकरकडे तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा. वरील ब्रोकरेज तुम्हाला परकीय बाजारात (अमेरिकी मार्केटमध्ये) गुंतवणूक करण्यासाठी सेवा देतात.
- तुमचे पॅन कार्ड, आधार आणि बँक खाते तुमच्या खात्याशी लिंक केल्याची खात्री करा. काही ब्रोकर परदेशी स्टॉक्स खरेदी करण्यास तुम्हाला अतिरिक्त फॉर्म भरण्यास सांगतात.
- ब्रोकर ॲप किंवा वेबसाइटवर लॉगिन करा करून इंटरनॅशनल स्टॉक्स किंवा अमेरिकी स्टॉक्स विभागात जा. एसके हायनिक्स ADR सिम्बॉल शोधा (लिस्टिंगनंतर सूची उपलब्ध होईल).
- कंपनीचे पूर्ण नाव दक्षिण कोरियाची एसके हायनिक्स (SK Hynix) आहे.
- तुमच्या बँक खात्यातून रुपये हस्तांतरित करा आणि डॉलर्समध्ये रूपांतर करा. त्यानंतर उपलब्ध ADR शेअर्स निवडा आणि खरेदी करा.
- शेअर्स खरेदी केल्यानंतर नियमित किंमत तपासा.
एसके हायनिक्सचे लिस्टिंग यशस्वी झाले तर, यामुळे जागतिक टेक कंपन्यांमध्ये या कोरियन कंपनीचे स्थान आणखी मजबूत होईल. जागतिक स्तरावर एआयच्या वाढत्या मागणीमुळे Chip कंपन्यांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या असून एसके हायनिक्सच्या या निर्णयावरूनएआय आणि सेमीकंडक्टर उद्योग भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी असू शकतात, असे दिसून येते.
(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यास लेखक किंवा महाराष्ट्र टाइम्स व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.)

