Headlines

Sindhudurg Kudal Apla Bazaar Mall FDA Raids Inaugurated by Actress Prajakta Mali Two Days Ago; दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते थाटात उद्घाटन, काल त्याच मॉलवर FDAची धाड; नेमकं काय घडलं?


Kudal Apla Bazaar Mall FDA Raids : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धुमाकूळ घातला आहे. त्याचदरम्यान, कुडाळमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते झालेल्या मॉलवर देखील छापा टाकण्यात आलेला आहे.

Kudal Apla Bazaar Mall FDA Raids
कुडाळ आपला बाजार मॉल प्राजक्ता माळी उद्घाटन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कोकणातही काही ठिकाणी या कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. अशीच एक मोठी कारवाई कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘आपला बाजार’च्या मॉलवर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे.

प्रशासनाचा थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ परिसरात या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 17 जून रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते अत्यंत दिमाखात आणि मोठ्या थाटामाटात शुभारंभ झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’ या भव्य मॉलवर शुक्रवारी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या पथकाने धाड टाकत चौकशी सुरू करत थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे.
Maharashtra TimesUddhav Thackeray Speech: ओमराजेंचं बंड उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी; निवडणुकीच्या सभेतील तो प्रसंग सांगत सगळंच काढलं!

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाचं पथक काल शुक्रवारी अचानक मॉलमध्ये धडकले. अधिकाऱ्यांनी आत पाऊल टाकताच सर्वात आधी मॉलमध्ये खरेदी करत असलेल्या ग्राहकांना तात्काळ बाहेर काढलं. त्यानंतर मॉलचे मुख्य दरवाजे बंद करून आतमध्ये चौकशीचा धडाका सुरू करण्यात आला. सध्या पथकाकडून मॉलच्या व्यवस्थापनासह संपूर्ण स्टाफची कसून चौकशी केली जात आहे. अन्नपदार्थांचे परवाने, साठा आणि कायदेशीर कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. अवघ्या 48 तासांपूर्वी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रिबन कापून सुरू झालेल्या मॉलवर अशी कोणतं मोठं संकट आलं की, थेट अन्न व भेसळ अधिकाऱ्यांना धाव घ्यावी लागली? हा विषय सध्या सध्या कुडाळमध्ये चांगलाच चर्चेचा झाला आहे. उद्घाटनाची चर्चा ओसरते ना ओसरते, तोच मॉलवर सरकारी पथकाची धाड पडल्याची बातमी कुडाळ शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि मॉलच्या बाहेर नागरिकांची गर्दी झाली.

उघड्यावरील चायनीज सेंटर बिर्याणी सेंटर यांच्याकडे दुर्लक्ष

दरम्यान, सध्या कोकणात काही दुकानावर धाडी घालण्यात येत असल्या तरीही चक्क उघड्यावर चायनीज सेंटर व बिर्याणी सेंटर सुरू असलेल्या ठिकाणी विक्रेत्यांवर मात्र प्रशासनाचे अधिकारी कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीयेत. या उघड्यावरील चायनीज सेंटर व बिर्याणी सेंटरकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालं आहे. या चायनीज सेंटरमधून टोमॅटो सॉससारखे पदार्थही विकले जातात. या सेंटरवरील अन्नपदार्थांची, मसाल्यांची आणि सॉसचीही प्रयोगशाळेत तपासणी होणे आवश्यक आहे.
Maharashtra TimesPune ST Bus: पुणे विभागात एसटीचे उत्पन्न वाढले! बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कारवाई; १५ दिवसांत ५ कोटी रुपयांची वाढ
इतकंच नाही तर कोकणातील अनेक चायनीज सेंटरच्या बाहेर 100 फुटांवर उभे राहिल्यास अनेकजणांचे डोळे चुरचुरतात हा अनुभवही अनेकांनी घेतला आहे, त्यामुळे या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचीही तपासणी होणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्हाभरात काही चायनीज सेंटर व बिर्याणी सेंटर चक्क रस्त्याच्या कडेला उघड्यावरच सुरू असतात. इतकंच नाही तर आरोग्यविषयीचे कोणतेही निकष पाळले जात नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी चक्क उघड्यावर सुरू असलेल्या चायनीज सेंटर व बिर्याणी सेंटरचीही तपासणी करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा