शेकडो कोटींचा मालक अमेरिका सोडून भारतात परतला
उद्योजक Vineeth K यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमुळे याच प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. विनीत यांनी आपल्या पोस्टमध्ये एका माजी कॉलेज सहकाऱ्याची कहाणी सांगितली, ज्याने अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये यशस्वी कंपनी उभी केली आणि कोट्यवधींची संपत्ती कमावली. पण, कौटुंबिक वाद, कायदेशीर बाबी आणि मानसिक आरोग्याच्या आव्हानांनी आयुष्याची दिशाच बदलली.
Housing Society Rules: फ्लॅटची बाल्कनी तोडून बेडरूम वाढवणे, ग्रिल लावणे महागात पडू शकते! हायकोर्टाने सरकारला कोणते निर्देश दिले? येथे वाचा
सिलिकॉन व्हॅलीत उभारला मोठा व्यवसाय
विनीत म्हणतात की, त्यांच्या माजी बॅचमेटने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिलिकॉन व्हॅलीत एक यशस्वी कंपनी उभी केली आणि लवकरच उच्चभ्रू मिलिनियर्सपैकी बनला. व्यावसायिक यशामुळे त्यांचा मित्र आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती कमावली.
3 रुपयावर 66,92,535 टक्के रिटर्न; MRF ला टक्कर देणारा करोडपती Elcid Investments शेअर आता रोडवरती, गुंतवणूकदारांच्या पैशांना ग्रहण
कौटुंबिक वाद अन् मानसिक संघर्षांने आयुष्याला कलाटणी
विनीतनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, काही वर्षांपूर्वी उद्योजकाला वैयक्तिक आयुष्यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले. पत्नी, सासरचे लोक आणि इतर कौटुंबिक वादांमुळे कायदेशीर अडचणीत सापडला, याच काळात नैराश्यातही गेला. परिस्थिती अशी झाली की उद्योजकाला मुलापासून वेगळं व्हावं लागलं ज्याचा त्यांच्या मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आणि अखेरीस अमेरिका सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
आता कुठं राहतोय करोडोंचा मालक
आज 100 कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता असूनही हा उद्योजक भारतातील एका छोट्या गावात राहत असल्याचा विनीतनी दावा केला. इथे उद्योगपती आपला बहुतेक वेळ देवाप्रती भक्ती, आध्यात्मिक शांती आणि मानसिक स्वास्थ्याला प्रेरणा देणारे व्हिडिओ बनवण्यात घालवत असून या व्हिडिओतून आजही त्याचा संघर्ष दिसतो आणि मानसिक त्रासातून सावरण्याचा प्रवास किती कठीण असू शकतो हेही अधोरेखित करतात, असे विनीतने लिहिले.
Russia Sanctions: रशियन तेलावर अमेरिकेचा डोळा, भारत पुन्हा निशाण्यावर; 100% टॅरिफची लटकती मोठी तलवार, विधेयकाला ग्रीन सिग्नल
“मानसिक शांतीची किंमत नाही”
त्याचवेळी, आपला अनुभव सांगताना विनीत पुढे लिहितात की त्यांनी अशी अनेक अनेक प्रकरणे पाहिली आहेत, जिथं आर्थिक समृद्धी असूनही लोकांना मानसिक शांती नाही. पैसा कधीही मानसिक शांतीच्या अभावाची भरपाई करू शकत नाही, असं विनीत म्हणतात. त्यामुळे लोक संपत्तीला जितकं महत्त्व देतात, तितकंच महत्त्व त्यांनी आपल्या मानसिक आरोग्यालाही दिले पाहिजे.

